अहमदपुर तालुक्यात क्वारंटाइनचा फज्जा ; बाहेरुन आलेले शेकडो नागरिक हडोळतीत रस्त्यावर. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, May 28, 2020

अहमदपुर तालुक्यात क्वारंटाइनचा फज्जा ; बाहेरुन आलेले शेकडो नागरिक हडोळतीत रस्त्यावर.

अहमदपुर तालुक्यात क्वारंटाइनचा फज्जा ; बाहेरुन आलेले शेकडो नागरिक हडोळतीत रस्त्यावर.

लातूर ( तुषार ससाणे) : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदपुर तालुक्यातील हडोळती गावात मुंबई-पुणे व इतर रेड झोन शहरातून आलेले शेकडो नागरिक क्वारंटाइन न राहता गावात विनाकारण फिरत आहेत. अधिकृत्त २५९ जणांना ग्रामपंचायतने क्वारंटाइन केलेले आहे. या शिवाय बाहेरुन आलेले ७०० ते ८०० लोक मोकाट फिरत आहेत. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस वा अँटी कोरोना फोर्स मात्र सुस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नसलेल्या या गावात कोरोना रुग्ण सापडन्याच्या शक्यतेने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
हडोळती हे गांव अहमदपुर तालुक्यातील मोठी व्यापारपेठ असलेले गांव आहे. पंचक्रोशीतील १० ते १५ गावातील लोक येथे मोठी गर्दी करीत आहेत. येथे दुकाने उघडण्या संदर्भातील जिल्हाधिकारी यांच्या वेळापत्रकाच्या आदेशाला बहुतांश दुकानदार हरताळ फासत आहेत. सर्वच प्रकारची दुकाने सुरु आहेत. त्यामुळे या दुकानांवर नागरिकांची झुम्बड उडत आहे. परिणामी कोरोना रुग्ण आढळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
लॉकडाऊन १.० मध्ये हडोळतीमध्ये स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एसीएफने खूप तत्परता दाखवली होती, मात्र त्यानंतर प्रशासनामध्ये सुस्ती दिसून येत आहे.

बाहेरुन आलेले २५९ जणच क्वारंटाइन
हडोळती गावात बाहेरुन आलेले २५९ नागरिकांना स्थानिक प्रशासनाने क्वारंटाइन केलेले आहे. त्यामध्ये पुण्याहुन आलेले ११३, मुंबई ५९, कोल्हापुर ३४, गोवा ५, तेलंगाना १९, नांदेड ५, हैदराबाद १, धुळे ३, सिन्नर २, अहमदनगर १, कळमनुरी २ असे एकूण २५९ पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. या शिवाय बाहेरुन आलेले शेकडो नागरिक विना क्वारंटाइन गांवभर विनाकारण फिरत आहेत.

No comments:

Post a Comment