पी.एम.पी.एम.एल ला कामगारांच्या हितापेक्षा ठेकेदार व कंपण्यांचे हित महत्वाचे -दिपाली धुमाळ - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, May 28, 2020

पी.एम.पी.एम.एल ला कामगारांच्या हितापेक्षा ठेकेदार व कंपण्यांचे हित महत्वाचे -दिपाली धुमाळ
पुणे प्रतिनिधी: सद्यस्थितीत कोरोनामुळे संपुर्ण भारतात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. परिणामी सगळीकडे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे पी.एम.पी.एम.एल मधील कायम व रोजंदारी पदावरील सेवकांना मार्च २०२० या कालावधीतील पगार अदा करण्यात आलेला होता. वास्तविक प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेस सर्व कायम सेवकांचे पगार अदा करण्यात आलेले आहे, तसेच रोजंदारी पदावरील सेवकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेस होतो. परंतु माहे एप्रिल २०२० या कालावधीतील रोजंदारी पदावरील सेवकांचा  पगार अद्याप पर्यंत अदा करण्यात आलेला नाही. रोजदांरी सेवक यांची संख्या २१६९ इतकी आहे. रोजंदारीवर काम करणा-या सेवकांमध्ये कंड्क्टर, ड्रायव्हर, वर्कशॅ।प मध्ये काम  करणारे  सेवक आहेत. त्यामुळे  रोजंदारी पदावरील सेवकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदरील सेवकांमध्ये काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात, सद्यस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजंदारी सेवकांचा पगार देण्यास पी.एम.पी.एम.एल फंड उपलब्ध नाही अशी माहिती मिळाली आहे. परंतु पुणे महानगरपालिकेकडून वेतन देण्याचा हिस्सा पी.एम.पी.एम.एल प्रशासनाकडे  जमा करण्यात आला असूनही सेवकांना वेतन दिले जात नाही, हि गंभीर बाब आहे. या उलट पी.एम.पी.एम.एलच्या प्रशासनाने सेवकांना वेतन न देता इतर ठेकेदार व कंपन्यांचे बिल व वेतन अदा केले आहे. महाराष्ट्र शासन उद्योग उर्जा व कामगार विभाग यांचे कडून कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार घरी राहावे लागत असले तरी ते कर्मचारी कामावर आहेत असे समजून त्यांना वेतन व भत्ते अदा करण्यात यावे तरी याबाबत पावले उचलून पुढील कार्यवाही करुन रोजंदारी पदावरील सेवकांना तातडीने पगार अदा करण्यात यावा असे पत्र विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी
पी.एम.पी.एम.एल प्रशासनास 
दिले आहे. 


 

No comments:

Post a Comment