आंबेगाव - कळंब गावचे सुपुत्र कोरोना योद्धा बनून आपल्या पत्नीसह करतायेत कोरोना योद्धा - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, May 27, 2020

आंबेगाव - कळंब गावचे सुपुत्र कोरोना योद्धा बनून आपल्या पत्नीसह करतायेत कोरोना योद्धा

आंबेगाव तालुक्यातील कळंब गावचे सुपुत्र कोरोना योद्धा बनून आपल्या पत्नीसह करतायेत कोरोना योद्धा


प्रतिनिधी - स्वप्निल जाधव मंचर

कळंब मधील कहडने  परिवारातील 2 सुपुत्र आपल्या  पत्नीसह करोनाशी लढा देत असून.गावातून या परिवाराबद्दल   अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.या  कुटुंबाचा गावातील सामाजिक  कामासाठी नेहमीच मोलाचा वाटा  असल्याचे सांगण्यात येत आहे.

 कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ह्या गावातील कहडणे परिवारातील एकाच कुटुंबातील सदस्य वैद्यकीय क्षेत्रात डॉ सुहास कहडणे पत्नी डॉ सौ प्रतिभा कहडणे तसेच पोलीस विभागा मध्ये श्री सुदर्शन कहडणे व पत्नी  सौ दिपाली कहडणे कार्यरत असून कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोरोना युद्धात ते कोरोना योद्धा म्हणून सेवा देत आहेत.डॉ सुहास कहडणे हे मंचर येथे खाजगी दवाखाना चालवून होमिओपॅथी औषोधोपचार करतात गेली 2 महिन्यापासून उपजिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांच्या वतीने फ्लू क्लिनिक संकल्पना राबवताना त्यांचा सिहां चा वाटा होता त्या उपक्रमाची सुरवात त्यांनी स्वतः वैद्यकीय सेवा देऊन केली. त्यानंतर भीमाशंकर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांची त्यांच्या वस्तीवर जाऊन तपासणी करण्याचे काम त्यांनी केले सहकारी डॉक्टरांच्या मदतीने मंचर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे.तसेच सलग डॉक्टर व्यवसाया बरोबरच सलग 8 वर्षे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून  आपल  कर्तव्य उत्तम  प्रकारे बजावले तसेच कळंब ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही  त्यांनी गावातील सामाजिक बांधिलकी जपली आहे.आयुष मंत्रालयाने सूचित केलेल्या  आर्सेनिक अल्बम 30 ह्या औषधांचा प्रचार व प्रसार खऱ्या अर्थाने ह्यांनीच 2 महिन्यापासून केला आहे. त्यांनी मंचर घोडेगाव पोलीस स्टेशन कर्मचारी तालुक्यातील सर्व डॉक्टर्स पत्रकार मित्र शरद बँक निराधार बाल्कश्रम इत्यादी ठिकाणी कोरोना आजाराच्या विषयी मार्गदर्शन करून होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप केले.
डॉ प्रतिभा कहडणे ह्या उपजिल्हा रुग्णालय येथे होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून सध्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर जनरल ओ पी डी रुग्णांना सेवा देत असून रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे आयुष मंत्रालयाने सूचित केलेले होमिओपॅथिक मेडिसिन आर्सेनिक अल्बम 30 व इतर होमिओपॅथिक औषधे रुग्णांना
वितरित करत रुग्णांना त्यांना रुग्ण सेवा मिळून देण्यासाठी मदत करत आहेत. श्री सुदर्शन कहडणे हे पोलीस आयुक्त पुणे शहर कार्यालयात पोलीस नियंत्रण कक्ष बिनतारी संदेश विभागात कार्यरत असून कोरोनाच्या पार्शवभूमीवर अविरत सेवा देत आहेत.सौ दीपाली कहडणे ह्या पोलीस हवालदार ह्या गुन्हे अन्वेषण विभागात ( सि आय डी) येथे कार्यरत असून त्यांनी कोरोना बंदोबस्त नियोजन कामी आळेफाटा पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण येथे कर्तव्य बजावले आहे सध्या त्या गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे कर्तव्य बजावत आहे व सध्या मुलाला घरापासून लांब मावशीकडे 2 महिन्यापासून खबरदारी म्हणून ठेवले आहे
सदर कुटुंबातील चार ही सदस्य कोरोनाच्या पार्शवभूमीवर आपली अखंड डॉ सुहास कहडणे व डॉ प्रतिभा कहडणे वैद्यकीय सेवा तसेच श्री सुदर्शन कहडणे व सौ दिपाली कहडणे ह्या आपले कर्तव्य बजावत अविरत सेवा देत आहेत अनेक पिढ्यानंपासून कहडने कुटुंबीयांचा गावातील सामाजिक कामात मोलाचा वाटा असून हे कळंबचे सुपुत्र अजूनही आपली कर्तव्य बजावून आपली सामाजिक बांधीलकी जपत असून ह्याचा आम्हाला अभिमान असे कळंब ग्रामस्थांनी सांगितले.

No comments:

Post a Comment