वधू-वर कोणत्याही वाहनाचा वापर न करता;थेट बैलगाडीतून नवरी घरी?? - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, May 25, 2020

वधू-वर कोणत्याही वाहनाचा वापर न करता;थेट बैलगाडीतून नवरी घरी??बीड (प्रतिनिधी):माजलगाव तालुक्यातील युवा व्यवसायिक चंद्रकुमार शिंदे यांनी खर्चाला फाटा देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला, चि.चंद्रकुमार हरिभाऊ शिंदे रा, सोन्नांथडी ता माजलगाव जिल्हा बीड व चि.सौ.का योगिता नारायण मदने रा. हातगाव यांचा नोंदणीकृत विवाह साध्या पद्धतीने आज दि 24/06/2020 रोजी संपन्न झाला, एकदम साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला, एक विशेष वधू-वर यांनी कोणत्याही वाहनाचा वापर न करता वधू मुलीच्या घरून वर मुलांच्या आपल्या घरी चक्क बैलगाडी मधून आपल्या घरी कोणताही खर्च न करता आणले, या विवाह सोहळ्यात विशेष  उपस्थिती शासकीय अधिकारी गावाचे तलाठी आबारे साहेब व ग्रामसेवक उद्दावनकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला, व समाजातील अनेकांनी शिंदे यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या..!

No comments:

Post a Comment