प्रथम व द्वितीय वर्षा प्रमाणे अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या ही परीक्षा रद्द कराव्यात :- अरविंद इनकर - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, May 24, 2020

प्रथम व द्वितीय वर्षा प्रमाणे अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या ही परीक्षा रद्द कराव्यात :- अरविंद इनकरबीड (प्रतिनिधी):आज घडीला COVID 19 सारख्या आजाराने आपल्या देशातच नव्हे संपूर्ण जगात थैमान घातले आहे आपल्या भारतातही आजघडीला कोरोनाव्हायरस चे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत त्यामुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातही कोरोना वायरच्या च्या केसेस वाढत आहेत शिवाय आता पावसाळी जवळ येत आहे अशातच अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या परीक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपला आहे 8 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदय जी सामंत साहेब यांनी सर्व विद्यापीठाच्या प्रथम , द्वितीय , तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देतात प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचं सर्व पालक वर्गातून व विद्यार्थी वर्गातुन स्वागत होत आहे त्याप्रमाणेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घ्यावा कारण आज घडीला अंतिम वर्षातील आठ ते दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत आणि हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडले तर त्यांच्या जिवावर बेतू शकते कारण जर कोरोना वायरस चा धोका हा जसा प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याला आहे त्याचप्रमाणे अंतिम वर्षातील विद्यार्थ्याला आहे दोन दिवसापूर्वी माननीय उदय सामंत साहेबांनी परीक्षा रद्द करण्याबाबत पत्र लिहिले आहे परंतु यूजीसी अद्यापही त्या पत्राचा उत्तर दिलं नाही तसेच उच्च शिक्षण हा मूलभूत हक्क नाही परंतु आरोग्य हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे यूजीसीने नक्कीच मा उदयजी सामंत साहेब यांनी दिलेल्या पत्राचा विचार करावा व विद्यार्थ्याचा ऐरणी वर पडला प्रश्न मार्गी लावावा ही विनंती.

No comments:

Post a Comment