अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; पुन्हा ४ रुग्ण आढळले. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, May 21, 2020

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; पुन्हा ४ रुग्ण आढळले.

नगर मधील त्या रिक्षावाल्याची फॅमिली कोरोना बाधित... नगरची संख्या ७२ वर!

कोरोना बाधीत आढळलेल्या नगर मधील त्या रिक्षावाल्याची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण. तर राशीन मध्ये मुलीकडे थांबलेल्या मूळच्या मुंबईकर महिलेलाही कोरोना...

अ.नगर, दि.२१- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल  नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या ७५ वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव आला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
आज सायंकाळी हे सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये नगर शहरातील रिक्षा चालकाच्या कुटुंबातीलच तिघेजण बाधित आढळून आले.
मूळच्या मुंबईकर येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे मुलीकडे आल्या होत्या. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज तो अहवाल प्राप्त झाला. त्यात या महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

1 comment: