दिंडोरी - तळेगांव दिंडोरी येथे पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यु. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, May 20, 2020

दिंडोरी - तळेगांव दिंडोरी येथे पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यु.

तळेगांव दिंडोरी येथे पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून  मृत्यु.


दिंडोरी  तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील रहिवासी कु. यश कांतिलाल उगले (१४) हा गावालगत बिरोबा  येथील विहिरीवर पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याने  गावांत हळहळ व्यक्त केली जात आहे.   


यश हा दिंङोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये  इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत होता.यश घरात कुणालाही
 न सांगता  एकटाच पोहण्यासाठी   गेल्याने सायंकाळी आईने यश घरी न परतल्याने गावात शोधा शोध सुरु केली. माञ यश गावात कुठेही सापडला नाही. एकुलता एक मुलगा असल्याने त्यांना यशची चिंता वाढु लागली .माञ सकाळी यश विहिरीकडे जाताना दिसला होता अशी कुणकुण  काणी लागताच गावातील नागरिक बिरोबा येथील विहिरीवर जावून पिंपळगाव केतकी  येथील पट्टीचे पोहणार रामदास यांच्या मदतीने पाण्यात शोध घेतला असता यशाचा मृत देह हाती लागला.

यशच्या मृत्यूने गावांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुकदेव खुर्दळ दिंङोरी प्रतिनिधी

No comments:

Post a Comment