शिरूर - कवठे येमाई ता. शिरुर येथे आढळले तीन कोरोनाबाधित रुग्ण, तालुक्यातील बेट भागात खळबळ. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, May 19, 2020

शिरूर - कवठे येमाई ता. शिरुर येथे आढळले तीन कोरोनाबाधित रुग्ण, तालुक्यातील बेट भागात खळबळ.

कवठे येमाई ता. शिरुर येथे आढळले तीन कोरोनाबाधित रुग्ण, तालुक्यातील बेट भागात खळबळ.
सविंदणे दि. १९ ( वार्ताहर )

शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे मुंबईवरून आलेल्या चार पैकी एकाच कुटुंबातील तीन  जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती शिरूर प्राथमिक रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा एकदा हादरला असला तरी आलेले कुटुंबीय मुंबईचे असून त्यांचा इतर कोणाशी जास्त संबंध आला नसल्याचे डॉक्टर राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.परंतू त्यांना मुंबईवरुन आणणारा साकोरी ता. जुन्नर येथिल जावई कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे.

याबाबत वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की की चार-पाच दिवसापूर्वी मुंबई वरून चार जण कवठे येमाई येथे आली होती .त्यांना कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने क्वरटाईन करण्यात आले होते.

परंतु त्यांच्या हिस्टरी मध्ये मुंबई येथे त्यांचा मुलगा करुणा पॉझिटिव्ह आढळून त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजल्यावर या चार जणांचे कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात चार पैकी तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

त्यामुळे कवठे यमाई परिसर सील करण्यात आला असून नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment