शिरूर - बडया नेत्यावर गुन्हे दाखल ,मै हु डॉन या गाण्यावर डान्स करणे पडले महागात. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, May 17, 2020

शिरूर - बडया नेत्यावर गुन्हे दाखल ,मै हु डॉन या गाण्यावर डान्स करणे पडले महागात.

शिरूर - बडया नेत्यावर गुन्हे दाखल ,मै हु डॉन या गाण्यावर डान्स करणे पडले महागात!

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील घटना...


 शिरूर - देशभरात कोरोनाचे भयानक संकट उभे राहिलेले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळे आदेश पारित केलेले असताना देखील पुणे जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालन न केल्याने पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची घटना घडली आहे.
 शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक ब्रम्हा पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोवार यांच्या मोबाईल वर बाबू पाटील ढमढेरे यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ दिसून आला त्यामध्ये मंगलदास बांदल माईक घेऊन मै हु डॉन हे हिंदी गाणे गात होते, त्यामध्ये काही लोक त्यांना हातवारे करून साथ देत होते त्यापैकी काही लोकांनी तोंडावर लावण्याचा मास्क गळ्यात अडकविलेला होता, त्या इसमांनी सध्या सुरु असलेल्या कोव्हीड १९ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणतीही खबरदारी घेतली नाही तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या तोंडावर मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर ठेवणे, पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये या आदेशाचे पालन केले नाही, त्यामुळे गाण्याचे गायन आणि डान्स करणाऱ्या इसमांनी नियमांचा भंग करत जीवितास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेले वर्तन केले त्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक ब्रम्हा हनमंत पोवार रा. शिक्रापूर ता. शिरूर जि पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष मंगलदास बांदल रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे, भारतीय जनता पार्टीचे नेते संदीप भोंडवे रा. लोणीकंद ता. हवेली जि. पुणे, शिक्रापूरचे माजी सरपंच संजय जगताप रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांसह इतर सात ते आठ इसमांवर विविध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.


राजकीय नेत्यांवरील गुन्ह्याने खळबळ.........
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पुणे जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांवर अचानक गुन्हे दाखल झाल्याची घटना घडली असून पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह आदी कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यकर्त्याचा अति उत्साही पणा आला अंगलट
मंगलदास बांदल यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या त्यांच्यात एका अति उत्साही कार्यकर्त्याने बांदल हे गात असलेले गाणे अति उत्साही पणाने सोशल मिडीयावर प्रसारित केले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असल्याने बांदल यांच्याच अति उत्साही कार्यकर्त्याचा अति उत्साही पणा आला अंगलट असल्याचा प्रकार घडला आहे.

( अरुणकुमार मोटे -शिरूर)

No comments:

Post a Comment