शिरुर तालुक्यातील मानूर चेकपोस्टवर कारवाई-आरोपी अटक -एकुन 72236रुपये किमंतीचा गाडी व दारु जप्त
बीड प्रतिनिधी :तालुक्यातील मानूर चेकपोस्ट वरून अवैधपणे दारू घेऊन जाणाऱ्या एकाला पकडले असून देशी दारूच्या 33 बाटल्यासह मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.देशी संत्रा कंपनीच्या 33 बाटल्यांचा बॉक्स अंदाजे किंमत 1716 रुपये आणि* *मोटारसायकल क्रमांक एम.एच.23,ए.पी.4058. मोटार सायकलची किंमत चाळीस हजार रुपये, एकूण मालाची किमंत 41716 ऐवाढी असुन दि.15 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आली आहे.गेवराई तालुक्यातील संगमजळगाव येथील सुनील राधाकिसन सदाफुले याने अहमदनगर जिल्ह्यातुन बेकायदेशीरपणे दारू आणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादंवी कलम 188,269,270 भादंवी 51 क्रमांक (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मुंबई दारूबंदी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे* *पुढील तपास सहपोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोमनाथ जायभाये हे करत आहेत
No comments:
Post a Comment