पारनेर - टाकळी येथील 36 वर्षीय महिलेचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ ; तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ५. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, May 31, 2020

पारनेर - टाकळी येथील 36 वर्षीय महिलेचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ ; तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ५. | C24Taas |

पारनेर - टाकळी येथील 36 वर्षीय महिलेचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ ; तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ५. | C24Taas |

पारनेर - तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील विलगीकरण केंद्रातील 36 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. टाकळी ढोकेश्वर येथील विलगीकरण केंद्रातील ७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे.
ही महिला १८ मे रोजी हिवरे कोरडा येथील कोरोनाबाधित व्यक्तीबरोबर ठाण्याहुन प्रवास केल्याने संपर्कात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
    या हिवरे कोरडा येथील कोरोना बाधित व्यक्तिच्या संपर्कात ८ व्यक्ति आल्या होत्या. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांचे स्त्राव घेण्यात आले होते.
दरम्यान दि. 18 मे रोजी हिवरे कोरडा येथील व्यक्तीच्या संपर्कातील आलेल्या टाकळी येथील आठ जणांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातीलच या 36 वर्षीय महिलेचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. आता पारनेर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पाच झाली आहे.

प्रशासनाचे पुढील आदेश येइपर्यंत टाकळी ढोकेश्वर पूर्णपणे बंद ठेवण्याचे तसेच कोणीही नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.

 विनोद गायकवाड. C24 तास, पारनेर

No comments:

Post a Comment