नेवासा शहरातील दुकाना उद्यापासून सुरू करण्यासाठी नगरपंचायत कडून शहरातील उजव्या - डाव्या बाजूची दुकाने दिवसाआड सुरू करण्यासाठी आज 13 मे रोजी जाहीर करण्यात आले. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात होणारी गर्दी रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार दुकाने सुरू ठेवण्याबाबत नगरपंचायत च्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने ठरविण्यात आलेल्या वारांप्रमाणे, तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने रविवार वगळून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. तर रविवारचा आठवडा बाजार लॉकडाऊन संपेपर्यंत पूर्णत: बंदच राहणार आहे. रविवारच्या दिवशी हॉस्पिटल व मेडिकल सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक दुकानदाराने नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करणार असल्याचे नगरपंचायत चे मुख्याधिकारी समीर शेख यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यातील बातम्यांसाठी WhatsApp group जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/EXYTrNII5WG6vceCJ1zAJd
No comments:
Post a Comment