नेवासा - स्व. मारुतराव घुले पा. पतसंस्थेच्या वतीने ६०० गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, April 30, 2020

नेवासा - स्व. मारुतराव घुले पा. पतसंस्थेच्या वतीने ६०० गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप. | C24Taas |

नेवासा - स्व. मारुतराव घुले पा. पतसंस्थेच्या वतीने ६०० गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप. | C24Taas |


नेवासा - कोरोना विषाणू संसर्ग आजार थांबविण्यासाठी ३ मेपर्यंत  लॉकडाऊन आहे. या काळात रोज कमावून खाणार्‍या व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली असतांना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या व्यक्तींची गरजपूर्ती होत आहे. अशातच नेवासा येथील स्व. मारुतराव घुले पा. पतसंस्थेच्या वतीने नेवासा खुर्द व नेवासा बुद्रुक येथील गरजू नागरिकांना खाद्य तेल साखर शेंगादाणे चहा पावडर मिठ टुतपेस्ट साबण निरमा पावडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे सहाशे किट वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले की , कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यातच अतिआवश्यक व जिवनाश्यक वस्तू नागरिकांना मिळत आहे. मात्र जे व्यक्ती रोज कमावून रोज खातात अशा व्यक्तींना हा कालावधी कसा निघेल, ही चिंता अद्यापही कायम आहे. खरेतर या अस्मानी संकटांमुळे, नागरिक हवालदिल झाले आहेत .पतसंस्थे कडुन अशा व्यक्तींची माहिती घेण्यात येवुन गरजवंताना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करण्यात आले .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील उपाध्यक्ष महंमद शेख,संचालक डॉ.भाऊसाहेब घुले,,बाळासाहेब शिंदे , विजय गांधी नरसु लष्करे, किशोर सोनवणे, दिपक दुधे अंबादास ईरले नवनाथ धोगडे बाळासाहेब मारकळी ,संस्थेचे सचिव अंकुश धनक,लक्ष्मण नाबदे, ,विशाल जायगुडे, ज्ञानेश्वर लोखंडे,किशोर जाधव दत्ता लष्करे निखिल सोनवणे विनायक जाधव विलास पाटील अरुण गायके कृष्णा आरले अजय पारखे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment