नेवासा - नगर-औरंगाबाद महामार्गावर हंडी निमगाव शिवारात भरदिवसा रस्तालूट. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, April 12, 2020

नेवासा - नगर-औरंगाबाद महामार्गावर हंडी निमगाव शिवारात भरदिवसा रस्तालूट. | C24TAAS |

नेवासा - नगर-औरंगाबाद महामार्गावर हंडी निमगाव शिवारात भरदिवसा रस्तालूट. | C24TAAS |


नेवासा - नगर-औरंगाबाद महामार्गावर शेतीमालाची विक्री करून चाललेली पिकअप गाडी नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव शिवारात अडवून चालकाला मारहाण करीत सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल एका अज्ञात चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी चालक गणेश चव्हाण (रा.वजनापूर ता.गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी आहे की पिकअप क्र.(एम.एच.२० सी.टी.८४०४) पनवेल येथे आद्रक व टरबूज विक्रीतुन ७७ हजार २०० रुपये रक्कम चालक चव्हाण हे दि.११ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या दरम्यान गंगापूरकडे येण्यास निघाले.दुपारी साडेचारच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर हंडीनिमगाव शिवारात एक मोटार सायकल वरून आलेल्या इसमाने गाडी अडवून तू मला कट मारल्याच्या कारणावरून चव्हाण यांच्या पोटात लाथ मारली.इसमाने दमदाटी व शिवीगाळ करून चालक चव्हाण यांना नगर च्या दिशेने थोड्या अंतरावर नेले त्यावेळी चालक चव्हाण यांच्याकडून बळजबरीने खिशातील पैसे काढून घेतले तेथून निघून गेला.असे फिर्यादीत म्हटले असून सदर अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास नेवासा पोलीस करत आहे.

No comments:

Post a Comment