अहमदनगर - आलमगीर येथील ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, April 30, 2020

अहमदनगर - आलमगीर येथील ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज

आलमगीर येथील ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज

उर्वरित ७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह
अहमदनगर, दि. ३०-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल काल निगेटिव्ह आले होते. आज उर्वरित ०७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आलमगीर येथील एका ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २५ झाली आहे.

आज पुण्याहून उर्वरित ०७ अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आलमगीर येथील ही ३१ वर्षीय व्यक्ती ५ एप्रिल रोजी कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याला बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला

No comments:

Post a Comment