मंचर : आंबेगाव तालुक्यात नवीन सक्षम आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नेमावा - सरपंच दत्ता गांजाळे - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, April 28, 2020

मंचर : आंबेगाव तालुक्यात नवीन सक्षम आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नेमावा - सरपंच दत्ता गांजाळे

आंबेगाव तालुक्यात नवीन सक्षम आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नेमावा - सरपंच दत्ता गांजाळे

 मंचर : प्रतिनिधी स्वप्निल जाधव


सध्या देशामध्ये व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव वाढत आहे . परंतु अद्यापपर्यंत आबेगाव तालुक्यात एकही कोरोनाना रूग्ण आढळुन आलेला नाही . त्याकामी तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी अतोनात कष्ट घेतलेले आहे . नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळुन आपले व्यवहार बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केलेले आहे . मागील आठवड्यात साधारणतः २५० ते ३०० नागरिकांनी पुणे - मुंबई सारख्या हॉटस्पॉटवरून तसेच परगावावरून तालुक्यात आले आहे .याबाबत नागरिकांनी तहसिल कार्यालय आंबेगाव प्रशासनास कळवुनही प्रशासनाकडुन सबंधीतांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही किंवा त्यांना कोरोंटाईन केले जात नाही तसेच विलगीकरण कक्षात ठेवले जात नाही , तसेच सरकारकडुन धान्य येऊनही तालुक्यातील गोर - गरिबाना धान्य मिळत नाही त्यामुळे आंबेगाव तालुक्यात रेशनिंग बाबत तसेच रेशनिंग दुकानदारांबाबत नागरिकांच्या तक्रारी निर्माण होत आहे .

 त्यामुळे गोर - गरिबांवर उपासमारीची वेळे आलेली आहे. त्यावरही आंबेगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना नागरिकांनी फोन केल्यावर त्यांचे फोन घेतले जात नाही किंवा फोन घेतल्यावर त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. आतापर्यंत आबेगाव तालुक्यातील जनतेने किंवा स्थानिक सक्षम नागरिकांनी तालुका सांभाळलेला आहे . तालुक्यातील जनतेने प्रशासनास साथ दिलेली आहे त्यामुळे यावर वेळीच उपाय केला नाही तर तालुक्यातील जनतेने किंवा स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत केलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडेल त्यामुळे आंबेगाव तालुक्यास नवीन सक्षम आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नेमणेत यावा अशी विनंती सरपंच यांनी केली असून या बाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पुणे विभागीय आयुक्त, मा.जिल्ह्याधिकारी , यांना पाठवले आहे.

No comments:

Post a Comment