पारनेर - गुणोरेतील सर्वात मोठ्या दारूभट्टीवर छापा. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, April 22, 2020

पारनेर - गुणोरेतील सर्वात मोठ्या दारूभट्टीवर छापा.

पारनेर - गुणोरेतील  सर्वात मोठ्या दारूभट्टीवर छापा.


पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील कुकडी नदिपात्रालगत काटवनात असलेली सर्वात मोठी दारूभट्टी ( छोटा कारखाना) पारनेर पोलिसांनी उध्वस्त केला.
कोरोना महारोगाच्या काळात टाळेबंदी झाल्यापासुन  पारनेर पोलिसांनी कारवाई केलेली हि नववी भट्टी आहे.  पारनेरचे पोलिस राजेश गवळी यांनी गावठी दारूभट्टया  उध्वस्त करण्याचा सपाटा लावलेला आहे, आज हि मोठी कारवाई त्यांनी केली.
परिसरातील हि सर्वात मोठी दारूभट्टी असल्याचे बोलले जाते.
पारनेर पोलीस ठाणे हद्दीत म्हसे खुर्द , कूकडी नदीच्या काठावर शिरूर तालुका हद्दीवर हातभट्टीची रेड करण्यात आली असून, सुमारे 1500 लि रसायन, पाच ड्रम, चाळणी,कॅन आदी साहित्य आणि 40 लि तयार हातभट्टीची दारू असा एकूण 37000/_ रुपये चा मुद्देमाल मिळून आला आहे सदर हातभट्टीची दारू तयार करणारा आरोपी रोहिदास पवार हा पोलीसांची चाहूल लागताच नदीच्या पात्राचा फायदा घेऊन शिरूर तालुका हद्दीत पळून गेला आहे.

योग्य सॅम्पल राखुन रसायन जागिच नष्ट करून गुन्हा दाखल केला असुन API राजेश गवळी पारनेर पोलीस ठाणे त्यांच्या सोबत या कारवाईत पो.कॉ. रविंद्र पाचारने, भालचंद्र दिवटे,दत्ता चौगुले यांनी भाग घेतला.
गावठी दारूमुळे अनेकांचा एकमेकांशी संपर्क होवून रोग पसरण्याचा धोका असल्यामुळे या कारवाईबद्दल नागरीकांनी पारनेर पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment