कर्मचाऱ्यांचे पगार न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा -दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्तांना दिले निवेदन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, April 2, 2020

कर्मचाऱ्यांचे पगार न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा -दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

 

पुणे प्रतिनिधी: पुणे  महापालिकेच्या वतीने ठेकेदारी पद्धतीने रस्त्यांची साफसफाई आणि स्वच्छता केली जाते परंतु गेल्या तीन महिन्यांपासून या स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही यामुळे ह्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून याला संबधित ठेकेदार जबाबदार आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कडे पत्राद्वारे  केली आहे.

पालिकेच्या समाविष्ट गावांमध्ये आणि उपनगरांमधील प्रभागांमध्ये ठेकेदारांकडून सफाई कर्मचारी पुरविले जातात त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणच्या स्मशानभूमी, पालिकेच्या इमारती, उद्याने, दवाखाने, क्षेत्रीय कार्यालय तसेच खेळाची मैदाने अशा सर्व ठिकाणी ठेकेदारी पद्धतीने स्वच्छता आणि सुरक्षारक्षकही नेमले जातात. परंतु या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसून कोरोना  विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असताना अशाही परिस्थितीत हे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असून आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे.प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मागे आपला कुटुंब परिवार आहे परंतु वेतन मिळत नसल्याने त्यांचीही परवड होत आहे.  गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन मिळालेले नसून या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळही आली असून तरी त्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी  महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे

No comments:

Post a Comment