नेवासा - हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हाकेला ना. गडाख धावले. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, April 1, 2020

नेवासा - हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हाकेला ना. गडाख धावले.

नेवासा - हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हाकेला ना. गडाख धावले.

नेवासा - सध्या कोरोना च्या साथीने सगळे हैराण झाले आहेत, शासनाने ल़़ॉकडाउन केले असल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटूंबांची वाताहात होत आहे. आलेल्या दिवस कसा काढायचा असा मोठा प्रश्न या अनेक कुटूंबाच्यापुढे उभा राहिला आहे. नेवासे शहरात उत्तरप्रदेशातील हातगाडीवर फळ, ज्युस,कुल्फी विकणारे काही कुटूंबे रोजीरोटीसाठी त्रासलेले होते त्यांनी थेट त्यांच्या उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार आमदार राणु प्रतापसिंग ठाकूर यांच्याशी संपर्क साधून कैफीयत मांडली त्यांनी तात्काळ मंत्री गडाख यांच्याशी उत्तर प्रदेश मधून संपर्क साधला त्यावर आमदार ठाकूर यांनी मुदू व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी संपर्क करण्याची विनंती केली. तातडीने नामदार गडाखांनी या कुटूंबाची काळजी करू नको असे अश्वासीत करत काही वेळात या सगळ्या कुटूंबाना जिवानावश्यक वस्तू व धान्य पोहोच केले गेले.
  कोरोनाच्या धास्तीने सगळेच ग्रासले गेले आहेत. सध्या अनेकांना दोन वेळच्या पोटाची खळगी कशी भरावी असा मोठा प्रश्न तयार झाला आहे. त्यात काही परप्रांतीय नागरीकांचा मोठा सहभाग आहे. हातावर पोट असल्याने रोज कमावले तर खायचे अशी परिस्थीती असल्याने या कुटूंबाना रोजच्या जगण्याची लढाई कशी लढायचा असा यक्ष प्रश्न तयार झाला आहे. उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेश मोगरोरा,
बहटीचिरागपुर, चेकभोईदरी मतदार संघातील दहा ते बारा कुटूंबे शहराच्या विविध भागात कुल्फी, अननस, ज्यूस, पाणीपुरी, समोसे हे व्यवसाय करतात. गेल्या दहा दिवसांपासून यांचा व्यवसाय बंद असल्याने पोट कसे भरायचे अशी परिस्थीती तयार झाली होती. त्यात बाहेरच्या राज्यातील असल्याने कोणी परिचीत नाहीत, उधार किराणा धान्य कोण देणार हे मोठे अवघड झालेले, लहान मुले, वृध्द तसेच कुटूंबातील मानसाना निदान पोटापुरते तर मिळालेच पाहिजे पण करणार काय, त्यात संचारबंदी असल्याने बाहेर पडून गावाकडे जाता येत नाही. या कुटूंबातील कर्ते मानसे देखील हतबल झाली होती काय कराव ते सुचत नव्हते मग अखेर शेवटचा पर्याय  म्हणून त्यांच्या उत्तर प्रदेशातील साबजपूर मतदार संघ जिल्हा हरदोई येथील भाजपचे आमदार आमदार राणू प्रताप सिंग ठाकूर यांना संपर्क साधून वास्तव परिस्थीत सांगून मदत मागीतली. त्यांनी लगेत नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार व राज्याचे मुदू व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्याशी संपर्क करून या कुटूंबाना मदत करण्याची विनंती केली. नामदार शंकरराव गडाख यांनी तातडीने या सर्व कुटूंबाना लागेल ती मदत करण्याच्या सुचना केल्या. नेवासे नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नामदार गडाखांचे स्विय सहाय्यक सुनिल जाधव यांनी अनिल विद्यासागर शर्मा,अरुण विद्यासागर शर्मा वंदना अरुण शर्मा रेखा अनिल शर्मा, आकाश जयराम शर्मा,सुरज रमेश शर्मा,विनित सपी शर्मा,श्‍यामबिहारी शर्मा,रेणू शर्मा, सुधिर शर्मा,सीमा शर्मा,कल्लू बाबू शर्मा,सिकंदर खान,सचिन शर्मा,अभिषेक शर्मा,सुरेश राजभर,सावित्री सुरेश राजभर,अनिल राजभर,हिमांशू राजभर,
अंजली राजभर यांची भेट घेवून किराणा मालासह सर्व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करून काही गरज लागली तर पुन्हा संपर्क करण्यास सांगीतले. नामदार गडाख यांच्यामुळे मेटाकूटीला आलेल्या या सर्व व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment