नेवासा - शनिशिंगणापुरात साध्या पध्दतीने साजरा केला गुढीपाडवा उत्सव. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, March 25, 2020

नेवासा - शनिशिंगणापुरात साध्या पध्दतीने साजरा केला गुढीपाडवा उत्सव. | C24TAAS |

नेवासा - शनिशिंगणापुरात साध्या पध्दतीने साजरा केला गुढीपाडवा उत्सव. | C24TAAS |

नेवासा - शनिशिंगणापुर येथे चारशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच स्वयंभू शनिमुर्तीला कावडीचे पाणी न घालता व जत्रा रद्द करुन गुढीपाडवा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी मराठी नववर्षाच्या निमित्ताने शनिमुर्तीला काशी व प्रवरासंगम येथून कावडीच्या गंगजलाचा अभिषेक करुन गुढीपाडवा उत्सव साजरा केला जातो.

कावडीचे स्वागत,मिरवणूक आणि भाविकांना बेसन-पुरीचा महाप्रसाद वाटप होत होता.कोरोना व्हायरस संसर्गाची काळजी म्हणून देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा विभागाने काशी व प्रवरासंगम येथून आलेल्या कावडीला घरी काढून दिले.
आज मंदीरातील मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगेच्या पाण्याने स्वयंभू शनिमुर्तीला अभिषेक घालण्यात आला. देवाला साखर कडेगाठीची माळ घालण्यात आली.महंत
त्रिबंक महाराज यांच्या हस्ते साडेदहा वाजता आरती सोहळा झाला. शनिचौथरा परीसरात ग्रामस्थ व भाविकांना प्रवेश नव्हता. सर्वत्र जमावबंदीचा आदेश असल्याने मंदीराकडे दिवसभरात कुणीच फिरकले नाही.

No comments:

Post a Comment