दिंडोरी - मुलीच्या लग्नाची पत्रिका ही सामाजिक संदेश व प्रेरणा देणारी असून लग्न सोहळा - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, March 9, 2020

दिंडोरी - मुलीच्या लग्नाची पत्रिका ही सामाजिक संदेश व प्रेरणा देणारी असून लग्न सोहळा

विवाह सोहळा म्हटलं की,डोळ्यासमोर येते ते धुमधडाक्यातील लग्न अन बॅडबाज्या ,प्रामुख्याने यात लग्नपत्रिका तर आलीच.आमञंण देणे, आणि बरंच काही. पण जर घरो-घरी पोहोचलेली पत्रिका सामाजिक संदेश देणारी असेल तर... हो दिंडोरी तालूक्यातील वरखेङा  येथील पञकार बाळासाहेब अस्वले यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका ही सामाजिक संदेश व प्रेरणा देणारी असून लग्न सोहळा देखील सत्यशोधक पध्दतीने होणार असल्याने अस्वले कुटुंबातील लग्न सोहळा व लग्न पञिकेकडे कुतुहलांने पाहिले जात आहे.

 Anchor- दिंडोरी तालूक्यातील वरखेङा येथील अस्वले कुटुंबीयांकडे सध्या लग्नाची धामधुम सुरू आहे. लग्नसमारंभात आप्त ,इष्ट ,नातेवाईक व स्नेही उपस्थित रहावे यासाठी  पत्रिका पाठवून आमञंण पाठवले जात आहे. पुजाचा विवाह. १५ मार्च रोजी भगूर येथील आकाश साळवे यांच्यासोबत होणार असून, या विवाह  सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, अतिरिक्त खर्चाला फाटा देत सत्यशोधक पध्दतीने होणार आहे.

 Vo-  एक पाऊल स्वच्छतेकडे’, ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ’सारे शिकुया, पुढे जाऊया’, ’जंगल वाचवा, देश वाचवा’ असे महत्त्वपूर्ण संदेश पत्रिकेत देण्यात आले आहेत. जणू या पञिका द्वारे सामाजिक संदेश देवून जनजागृतीच करण्यात येत असून, सर्वञच कौतुक केलं जात आहे.

सुकदेव खुर्दळ दिंङोरी प्रतिनिधी

No comments:

Post a Comment