राहुरी - साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयाचा ७ वा वर्धापन दिन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, March 3, 2020

राहुरी - साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयाचा ७ वा वर्धापन दिन

राहुरी फॅक्टरी - अहमदनगर जिल्ह्यामध्ये आर्थिक दृष्ट्या अग्रगण्य असणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयाचा ७ वा वर्धापन दिन त्यानिमित्ताने प्रेरणादायी व्याख्यान आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवार दि ४  मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता राहुरी फॅक्टरी येथे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री.शिवाजीराव कपाळे यांनी दिली आहे.


याबाबत माहिती अशी की साई आदर्श मल्टीस्टेट च्या राहुरी फॅक्टरी येथील मुख्य शाखेचा सातवा वर्धापन दिन बुधवार दिनांक ४ मार्च रोजी होत आहे या निमित्ताने प्रेरणादायी व्याख्याते श्री.गणेश शिंदे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले असून 'हे जीवन सुंदर आहेया विषयावर ते व्याख्यान देणार आहेत तसेच अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व आदर्श गाव हिवरे बाजार चे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार व अकोला येथील बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपोरे यांचा विशेष सन्मान यानिमित्ताने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या बाल यात्रींचे कौतुक देखील करण्यात येणार आहे यामध्ये गणराज म्हसे या चौथी च्या विद्यार्थ्यांचा तसेच श्रेया सजन या तिसरीच्या विद्यार्थिनीचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सभासद हितचिंतक खातेदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री.शिवाजीराव कपाळे यांनी केली आहे.No comments:

Post a Comment