नेवासा - गरोदर मनोरुग्ण महिलेला मिळाले हक्काचे घर आधार प्रतिष्ठाणचा महिलादिनी उपक्रम. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, March 13, 2020

नेवासा - गरोदर मनोरुग्ण महिलेला मिळाले हक्काचे घर आधार प्रतिष्ठाणचा महिलादिनी उपक्रम.

नेवासा -  गरोदर मनोरुग्ण महिलेला मिळाले हक्काचे घर आधार प्रतिष्ठाणचा महिलादिनी उपक्रम.

गरोदर मनोरुग्ण महिलेला माऊली आश्रमात दाखल करण्यात आले त्यावेळी संचालक श्री व सौ डॉ धामणे, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मोटे

नेवासा - महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र महिलांचा आदर व सन्मान होत असताना तिसगाव ता.पाथर्डी येथे अनेक दिवसांपासून गरोदर मनोरुग्ण महिला भटकंती करत होती.दिवस भरत आल्याने तिच्या वेदना लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख,उपसरपंच भाऊसाहेब लवादे,राजु तांबोळी यांनी वडाळाबहिरोबा ता.नेवासा येथील आधार सेवा संकल्प प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयवंत मोटे यांना परिस्थितीची माहिती दिली.
माहिती मिळताच मोटे व प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते बाळासाहेब कोळसे व अजित मोटे गाडीने तिसगावला गेले.मनोरुग्ण  महिलेची रुग्णालयात प्राथमिक तपासणी करुन आवश्यक औषधे दिली. तिला नवीन साडी चोळी घालुन माऊली आश्रम (मनगाव) येथील डाॅ.सुचिता व राजेंद्र धामणे यांच्या बरोबर संपर्क केला आणि त्यांनी लगेचच होकार दिल्यानंतर महिलेस माऊली आश्रमात सुखरुप सोडण्यात आले. डाॅ.सुचिता धामणे यांनी सदर महिलेची तपासणी करुन तिच्यावर आवश्यक उपचार केले.स्वयंसेवक महिलांनी तिला स्नान घातले.विस्कटलेले केस सुरळीत केले. वाढलेले नख काढण्यात आले.तिचं बाळंतपण काही दिवसातच होणार असल्याने दोन स्वयंसेवक महिला तिची काळजी घेण्यासाठी नेमण्यात आल्या आहेत.
 आधार प्रतिष्ठाणने तीन महिन्यापूर्वी रस्त्यावर भटकंती करत असलेल्या तरुणीला मायेचा आधार देत तिला दोन वेळचं जेवण व सुरक्षा दिली.तिचे छायाचित्र सोशलमिडीया वर टाकले. दोनच दिवसात तिची ओळख पटली. यवतमाळ येथून आलेले पवार परीवारातील सदस्य तील घरी घेवून गेले. या विशेष कार्याबद्दल त्यावेळी आधार प्रतिष्ठाणचे अनेकांनी अभिनंदन केले होते.

 मानव सेवा हिच ईश्वर सेवा समजून आधार प्रतिष्ठाणच्या वतीने कार्य केले जाते.समाजात अनेक प्रश्न आहेत. 
विधायक कार्य करणा-या अनेक सेवाभावी संस्था आहेत.निराधारांना आधार देण्यासाठी निमित्त होणं महत्वाचं आहे. - जयवंत मोटे, अध्यक्ष,आधार प्रतिष्ठान

No comments:

Post a Comment