नेवासा - श्री कालभैरवनाथांना मुनोत परिवारा कडून 30 ग्रॅम चांदीचा टिळा अलंकार अर्पण. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, March 15, 2020

नेवासा - श्री कालभैरवनाथांना मुनोत परिवारा कडून 30 ग्रॅम चांदीचा टिळा अलंकार अर्पण.

नेवासा - श्री कालभैरवनाथांना मुनोत परिवारा कडून 30 ग्रॅम चांदीचा टिळा अलंकार अर्पण.

नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांना पुणे येथील उद्योजक व मुळचे नेवासा बुद्रुक येथील भूमीपुत्र रविंद्र मुनोत नेवासकर परिवाराच्या वतीने स्वर्गीय पन्नालाल मुनोत यांच्या स्मरणार्थ 30 ग्रॅम चांदीचा टिळा अलंकार रविवारी दि.१५ मार्च रोजी अभिषेक घालून अर्पण करण्यात आला.
यावेळी रविंद्र मुनोत यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात येऊन श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीची विधीवत पूजन करण्यात आले यावेळी राजेंद्र मुथ्था,देवस्थानचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण,शंकर नाबदे,अमित देवचक्के,नवनाथ जाधव, निलेश नळकांडे यांनी जलाभिषेक घालून श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न पुरोहित नितीनगुरू जोशी यांनी केले.

वारकरी संप्रदायातील निस्सीम सेवक म्हणून उद्योजक रविंद्र मुनोत यांनी घराण्यातील दानीवृत्तीचे दर्शन घडवत एक आठवडयापूर्वी श्री कालभैरवनाथ देवस्थानला एक लाख अकरा हजार एकशे अकरा अशी देणगी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते देवगड येथे झालेल्या कार्यक्रमात बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथ देवस्थानच्या विश्वस्तांकडे सुपूर्त केली होती.
श्री क्षेत्र बहिरवाडी येथे गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा नदीच्या मध्यधारेवर भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले असून या मंदिरातील असलेल्या श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीच्या मस्तकी रविंद्र मुनोत यांच्या हस्ते चांदी व सोन्याचा तीस ग्रॅमचा टिळा लावून अर्पण करण्यात आला.यावेळी आमटी भाकरीचा प्रसाद देणारे बाळासाहेब शेटे व टॅक्स कन्सल्टंट सचिन शेटे यांच्या हस्ते श्री कालभैरवनाथांची सपत्नीक आरती करण्यात आली.तर देणगी दिल्या बद्दल रविंद्र मुनोत व अन्नदान केल्या बद्दल सचिन शेटे यांचा श्री कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी श्री कालभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव कोलते,बी.जी.मिटकरे,सीताराम घोरपडे, दिनकरराव हारदे,दिलीप नळघे, बाबासाहेब वाखुरे,दुर्योधन भोंगळ,संतसेवक सोमनाथ वाखुरे,शिवाजी हारदे, बाबासाहेब कोलते,दिगंबर घोरपडे,भाऊ नांगरे,संजय नळघे,पिंटू नळघे,किशोर जमधडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शंकर नाबदे नेवासा.

No comments:

Post a Comment