नेवासा येथील दोघांवर गुन्हा दाखल,परदेशातील 10 इसमांना सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र करुन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, March 30, 2020

नेवासा येथील दोघांवर गुन्हा दाखल,परदेशातील 10 इसमांना सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र करुन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन. | C24TAAS |

नेवासा येथील दोघांवर गुन्हा दाखल,परदेशातील 10 इसमांना सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र करुन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन.

नेवासा - परदेशातील व्यक्तींना मशिदीमध्ये एकत्र करुन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघंन केल्या प्रकरणी नेवासातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबद पोकॉ प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी आज दि.30 मार्च रोजी सरकार तर्फे नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हंटले आहे की,आज रोजी सकाळी 07.00 ते 20.00 वा पावेतो मी तसेच, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस उपनिरीक्षक बी एस दाते, पोहेकॉ व्हि यु गायकवाड,पोहेकॉ टी बी गिते, पोकॉ ए एस कुदळे, पोकॉ एम एल मुस्ताफा,पोकॉ एस बी गुंजाळ असे सरकारी गाडी क्र-एमएच-16 एन-536 तसेच अधिग्रहन वाहनाने नेवासा पोलीस स्टेशन हद्दित कोरोना कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कडील आपत्ती व्यवस्थापन कायदा,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा,भारतीय साथ रोग अधिनियम व सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे कडील अधिसुचना कोरोनाचे अनुषंगाने कोरोना कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या तरतुदी नुसार उपाययोजना करणे आवश्यक असलेने त्याप्रमाणे रवाना झालो होतो. आम्ही वरील प्रमाणे स्टाप नेवासा शहरात पेट्रोलिंग करत असतांना 11.00 वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक आर एस डेरे यांना गुप्तबातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि नेवासा शहरात भालदार मज्जिद (मरकस मज्जिद) मध्ये मज्जिदचे ट्रस्टी पठाण जुम्माखान नवाबखान व सलिम बाबुलाल पठाण दो.रा- नेवासा खु ता-नेवासा यांना वरील आदेश माहीत असतांना ही त्यांनी सदर मज्जिद मध्ये बाहेर देशातील 10 व्यक्तींना प्रवेश दिला असुन ते तेथे राहत आहेत. मिळालेल्या बातमीवरुन आम्ही वरील स्टाप सदर ठिकाणी 11.30 वा गेला असता त्या ठिकाणी भालदार (मरकस) मज्जिदचे ट्रस्टी पठाण जुम्माखान नवाबखान आणि बाबुलाल पठाण दोघे राहणार नेवासा खु. यांच्यासह बाहेरील देशातील 10 इसम राहत असलेले मिळुन आले. यातील मज्जिद ट्रस्टी पठाण जुम्माखान नवाबखान, सलिम बाबुलाल पठाण दो.रा- नेवासा खु ता-नेवासा यांना जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाची माहीती असतांनाही जिबुती-देशातील(05), बेनिन देशातील(01), डेकॉर्ट देशातील(03), व घाना देशातील(01) असे एकुण 10 इसमांना सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र करुन कोरोना कोव्हीड-19 या रोगाचा फैलाव होईल हे माहीती असतांना त्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणुन माझी पठाण जुम्माखान नवाबखान व सलिम बाबुलाल पठाण दो.रा- नेवासा यांचे विरुध्द भादवी-188, 269,270,290 सह महाराष्ट्र पोलीस -1951 चे कलम-37(1)(3) प्रमाणे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघंन केले व महाराष्ट्र उपाय योजना नियम-2020 चे नियम 11 व भारतीय साथ रोग
कलम-02,03,04 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.
वरील फिर्यादी वरून नेवासा पोलीस ठाण्यात पठाण जुम्माखान नवाबखान व सलिम बाबुलाल पठाण दो.रा- खु ता-नेवासा यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment