नेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.? | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, February 8, 2020

नेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.? | C24TAAS |

नेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.? | C24TAAS |



नेवासा - नेवासा तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे या तरुणाला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आलं आहे.

नेवासा तालुक्यातील रहिवासी व अहमदनगर जिल्ह्यातील  एमआयडीसी येथील एका नामांकित कंपनीत काम करणारा २५ वर्षीय तरुण हा कंपनीच्या कामानिमित्त काही दिवसांपूर्वी चीनमध्ये गेला होता. दरम्यान चीनमधून घरी  परतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला श्रीरामपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्यात कोरोना व्हायरसची लक्षण आढळून आल्याने त्याला तातडीने अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर तात्काळ उपाय सुरु करण्यात आले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले असून तपासणी रिपोर्ट आल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झालेली आहे की नाही हे तपासून योग्य तो निर्णय घेऊन उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉक्टरांनी दिली आहे.

चीनमधून आलेला अहमदनगर जिल्ह्यातील २५ वर्षीय युवक हा करोनाचा संशयित असल्याने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात स्पेशल कोरोना व्हायरस आयसोलेशन कक्ष उभारण्यात आला आहे. या विशेष कक्षात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना येथे दाखल करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment