संगमनेर बसस्थाकामधून वयोवृद्ध आजीबाईच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले
संगमनेर : शाविद शेख
संगमनेर शहरातील बसस्थानकामधून घुलेवाडी परिसरात राहणाºया नानाबाई निवृत्ती डुबे सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध आजीबाईंच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवल्याची घटना बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमाास घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोन्याचे दागिने चोरणाºया चोरट्यांनी संगमनेर शहरात डोके वर काढले आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नानाबाई डुबे ही वृद्ध आजीबाई अमृतनगर घुलेवाडी याठिकाणी राहत आहे. बुधवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास त्या संगमनेरच्या बसस्थानकामध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्या एसटी बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत गळ्यात असलेले चार तोळे सोन्याचे तीन पदरी पोत, दोन मंगळसुत्राच्या वाट्या व एक राम पान असे सोन्याचे दागिने चोरुन पोबारा केला आहे. काही वेळाने गळ्यात दागिने नसल्याचे आजीबाईच्या लक्षात आले. त्यांनी एसटी बसमध्ये व खाली सगळीकडे शोध घेतला. पण कुठेच हे दागिने मिळून आले नाही. याप्रकरणी नानाबाई डुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. ७८/२०२० भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप बोटे हे करत आहेत. दरम्यान यापुर्वीही संगमनेर बसस्थानकातून अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

No comments:
Post a Comment