नेवासा - ना.गडाख यांच्या संपर्क कार्यालयात स्व.ठाकरे यांना अभिवादन. |C24TAAS| - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, January 23, 2020

नेवासा - ना.गडाख यांच्या संपर्क कार्यालयात स्व.ठाकरे यांना अभिवादन. |C24TAAS|

नेवासा - ना.गडाख यांच्या संपर्क कार्यालयात स्व.ठाकरे यांना अभिवादन. |C24TAAS|


नेवासा - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ना.शंकरराव गडाख यांच्या नेवासा येथील संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

ना.गडाख यांच्या संपर्क कार्यालयात स्व.ठाकरे यांच्या 94व्या जयंती दिनाचे औचित्य साधून अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप ताचे अनिल ताके यांनी स्व.ठाकरे यांची प्रतिमा ना.गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी ताके यांच्यासह गफूरभाई बागवान, युसूफभाई बागवान, भाऊसाहेब वाघ आदी मान्यवरांनी स्व.ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.


स्व.ठाकरे हे हिंदु बरोबरच मुस्लिमांचेही आधारस्तंभ होते, त्यांनी मुस्लिमांच्या भावनांची नेहमीच कदर केली, यामुळे मुस्लिम शिवसैनिक आजही मोठ्या प्रमाणावर आहेत, असे गौरवोद्गार  गफूरभाई बागवान यांनी यावेळी काढले. अनिल ताके यावेळी बोलताना म्हणाले की, स्व.ठाकरे यांनी राज्यात खऱ्या अर्थाने समता व बन्धुत्व स्थापन करून मराठी अस्मिता जोपासत राज्यातील सर्वच घटकांना न्याय दिला आहे.

यावेळी राहुल डेहाडराय, पोपटराव जीरे, युसूफ बागवान, अभिजित मापारी, विनायक नळकांडे, सुनील साळुंके, सुनील धायजे, गोरख घुले, नाना कवडे, बाळासाहेब कोकणे, राहुल जामदार, अन्सार शेख, अमित जेधे  आदी उपस्थित होते. ना.गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

शंकर नाबदे, C24 तास नेवासा.

No comments:

Post a Comment