नेवासा - ट्रॅव्हल - ढंपरच्या अपघातात १ जणाचा होरपळून मृत्यू. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, January 19, 2020

नेवासा - ट्रॅव्हल - ढंपरच्या अपघातात १ जणाचा होरपळून मृत्यू. | C24TAAS |


नेवासा - ट्रॅव्हल - ढंपरच्या अपघातात १ जणाचा होरपळून मृत्यू, प्रवरासंगम येथील घटना.






नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम येथे ट्रॅव्हल आणि ढंपरच्या अपघातात एकाचा होरपळून मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास घडली...

Video... 👇


नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर कामानिजवळ नगर कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स (क्र.जी.जे १४ झेड ८५८५ ) आणि ढंपरला (विना नंबर)धडक दिल्याने झालेल्या अपघातात ढंपरची डिझेल टाकी फुटून ढंपरने पेट घेतला.दरम्यान ढंपरमध्ये असलेला मजूर पांडुरंग रामकीसन गायकवाड(वय २७ रा.प्रवरासंगम ता.नेवासा) हा या अपघातात जखमी होऊन ढंपरमध्येच जळून मयत झाला आहे.तर ढंपर चालक अशोक शिंदे,ट्रॅव्हल्स चालक मोहन थावरा राठोड(रा.वडहुळी.ता.जिंतूर जि. परभणी),संतोष धोंगडे व इतर सात ते आठ प्रवाशी जखमी आहे.या अपघातमध्ये ढंपर पूर्णपणे जाळून खाक झाला आहे.तर ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. 
अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भारत दाते,पोलीस नाईक बबन तमनर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले व अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.
मयत पांडुरंग गायकवाड याचा भाऊ शहादेव रामकीसन गायकवाड याने ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध नेवासा पोलिसांत  ठाण्यात तक्रार दिली असून पुढील कारवाई नेवासा पोलीस करीत आहे.

C24 तास - शंकर नाबदे, नेवासा.

No comments:

Post a Comment