नेवासा - ना.शंकरराव गडाख यांचे जोरदार स्वागत ; तालुक्यात पुन्हा दिवाळी ; पूर्वीच्या टपरीवर घेतला चहाचा आस्वाद. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, January 1, 2020

नेवासा - ना.शंकरराव गडाख यांचे जोरदार स्वागत ; तालुक्यात पुन्हा दिवाळी ; पूर्वीच्या टपरीवर घेतला चहाचा आस्वाद. | C24TAAS |


नेवासा - ना.शंकरराव गडाख यांचे जोरदार स्वागत ; तालुक्यात पुन्हा दिवाळी ; पूर्वीच्या टपरीवर घेतला चहाचा आस्वाद. | C24TAAS |


नेवासा -  ना.शंकरराव गडाख यांचे नेवासा तालुक्यात जोरदार स्वागत झाले.सोनई येथील त्यांच्या निवसस्थानी नेवासा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील त्यांच्या हितचिंतकानी मोठी गर्दी केली होती. गेल्या 25 वर्षांपासून त्यांचे रस्त्यांवरील संपर्क कार्यालय असलेल्या हॉटेल मध्ये त्यांनी बाकड्यावर बसून चहा घेतला याची मोठी चर्चा झाली.
ना.गडाख यांनी सकाळी 9 वाजताच वंजारवाडी येथे भगवानबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले.ग्रामस्थांनी फटाक्यांची आतीशबाजी केली महिलांनी औक्षण केले. सोनई येथील मानाचा मारुती मंदिरातही जाऊन दर्शन घेतले त्यावेळी जेष्ट लोकांच्या संघटनेने त्यांचा सन्मान केला.
पद येतात जातात पण आपल्या माणसापासून मला कोणतेही पद,मंत्रिपद दूर होऊ देणार नाही याची मी नक्कीच काळजी घेणार आहे असे प्रतिपादन नामदार शंकरराव गडाख यांनी सोनई येथे कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान केले.मिळालेले मंत्रीपद तालुक्याच्या आणि महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेचया हितासाठी मी पणाला लावणार आहे. यशवंतराव गडाख साहेबांनी राजकारणातून समाजकारण केले त्याचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या धोरणाप्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हेच माझे धोरण असणार असल्याचे प्रतिपादन यावेळी नामदार गडाख यांनी केले.
आदर्शगाव हिवरे बाजरचे पोपटराव पवार , आमदार लहू कानडे , दौलतराव पवार , माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ,नगर जिल्हा परिषद उप अध्यक्ष प्रताप शेळके , जेष्ट नेते बन्सीभाऊ म्हस्के , शिवसेना नेते शशिकांत गाडे , रावसाहेब खेवरे , अनिल कराळे ,जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचवरे , बाळासाहेब हराळ, राजेंद्र गुंड नगरचे माजी महापोर अनिल लोखंडे , शिर्डीचे अभय शेळके , विजय जगताप ,नगरचे नगरसेवक सचिन जाधव , अविनाश घुले , नितीन मरकड , अजय ढोणे यांच्यासह नेवासा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते .
ना शंकरराव गडाख यांची राजकारणात सुरवात झाल्यावर ते सोनई येथील चहाच्या टपरीवर बसत होते आमदार झाल्यावरही त्यांनी जनतेला भेटण्यासाठी तेथेच संपर्क कार्यालय बनविले आता नामदार झाल्यावर त्यांच्या जुन्या ठिकाणी बसून ना गडाख यांनी चहा घेतला व आपला सामान्य कार्यकर्त्यांत बसण्याचा पिंड सोडला नाही व कुठलाही बडेजाव न ठेवता प्रत्येकाची आस्थेने विचारपूस केली.बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - शंकर नाबदे,नेवासा.

No comments:

Post a Comment