पुणे प्रतिनिधी: भारत श्रीलंका मॅच दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या गलथान कारभारा विरोधात भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गहुंजे स्टेडियम येथे मोठे जन आंदोलन करण्यात येणार असून एमसीएने महाराष्ट्र शासनाची स्टॅम्प ड्युटी बुडवली असून स्टेडियम समोरील पार्किंगची जमीन या गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे एमसीएची निवड समिती बेकायदेशीर असून धर्मादाय सहआयुक्त यांच्याकडे चेंज रिपोर्ट दिले नाही आदी मागण्या जिल्हाधिकारी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार दिली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे परंतु अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नसून त्यासाठी मोठे जनआंदोलन भारत-श्रीलंका मॅचच्या दिवशी म्हणजेच 10 जानेवारीला गहुंजे स्टेडियम येथे करण्यात येणार आहे या स्टेडियम मध्ये आंदोलकांकडून साप सोडण्यात येणार आहेत अशा अफवा मुद्दामून पसरविल्या जात आहेत आमचे आंदोलन हे सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने असणार आहे याचा कोणाला त्रास होणार नाही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्राध्यक्ष आणि बहुजन हृदयसम्राट हेमंत पाटील यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन केली आहे
No comments:
Post a Comment