नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर यांच्या प्रयत्नांना यश, प्रभाग १३ मधील पाणी प्रश्न सोडविणार -आयुक्त,महापौर यांनी दिला शब्द.. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, January 15, 2020

नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर यांच्या प्रयत्नांना यश, प्रभाग १३ मधील पाणी प्रश्न सोडविणार -आयुक्त,महापौर यांनी दिला शब्द..

 
येत्या १० दिवसांत प्रभाग १३ मधील पाणी प्रश्न सोडविणार -आयुक्त सौरभ राव यांचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या साक्षीने वचन..

नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर यांच्या प्रयत्नांना यश


पुणे प्रतिनिधी: प्रभात रस्ता,लॉ कॉलेज रस्ता,सहकार वसाहत यासह विविध भागातील पाण्याच्या प्रेशर च्या तक्रारींसह एकूणच पाणीप्रश्नाबाबत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांसह बैठकीचा आग्रह धरला होता.त्यानुसार आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त सौरभ राव यांच्यासह बैठकीचे आयोजन केले होते.

सदर बैठकीत सौ.खर्डेकर यांनी पर्वतीजलकेंद्रातून  SNDT च्या टाकीत पुरेशा प्रेशर ने पंपिंग होत नसल्याने प्रभागात सर्वत्र समान पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी प्रकर्षाने मांडल्या.शिवाजीनगर मतदारसंघातील नगरसेवकांनी देखील अश्याच स्वरूपात तक्रारी मांडल्या.यावर येत्या ८/१० दिवसांत समक्ष पाहणी करुन सदर समस्या सोडविण्याचे वचन आयुक्तांनी दिले या बैठकीत पाणीपुरवठा खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment