एकदा जिद्द मनात आणली की असंख्य अडचणीतही कल्पकतेने कामे होऊ शकतात- खासदार गिरीश बापट वडगाव येथे क्रीडामैदानाचे उदघाटन संपन्न - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, January 29, 2020

एकदा जिद्द मनात आणली की असंख्य अडचणीतही कल्पकतेने कामे होऊ शकतात- खासदार गिरीश बापट वडगाव येथे क्रीडामैदानाचे उदघाटन संपन्नपुणे प्रतिनिधी : पैसा असो नसो - पद असो नसो एकदा जिद्द मनात आणली  कि आपण  काय करू शकतो हे  मोठ्या कल्पकतेने असाकारलेल्या क्रीडामैदानाकडे पाहून लक्षात येते त्याबद्दल हे साकारण्यात पुढाकार घेणारे नगरसेवक हरिदास चरवड आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांचे कौतुक आहे .संपूर्ण पुणे शहरात टीमवर्क म्हणून सर्वात चांगले काम या प्रभागात होत असल्याचे मत खासदार गिरीश बापट यांनी वडगाव बुद्रुक जाधवनगर येथे साकारण्यात आलेल्या कै .श्रीमती . रुक्मिणीबाई विठ्ठलराव जाधव क्रीडामैदानाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
या मैदानावर महिलांसाठी स्वतंत्र दोन तास व्यायाम प्रकाराचे वर्ग विनामूल्य चालविण्यात यावेत. योगा हास्यक्लब  खेळासाठी प्रशिक्षक नेमल्यास येथील वातावरण आरोग्यदायी राहील.सतत दुस-याला काहीतरी देत रहावे .हा संस्कार या क्रिडांगणावर रूजावा. दर्जेदार खेळाडू इथे तयार व्हावेत. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळेस व्यक्त केली . 


या क्रीडामैदानावर हॉलीबॉल , कबड्डी ,बास्केटबॉल ,टायकोंदो इ.खेळाचे मैदाने असून वाचनालय आणि ओपन जिमचीही  सोय उपलब्द करून देण्यात आली  आहे .यावेळी आमदार भीमराव तापकीर म्हणाले की , नगरसेवक हरिदास चरवड स्वतः सिव्हिल इंजिनिअर असल्यानेच अत्यंत कमी जागा उपलब्ध असताना अत्यंत सुंदर आणि कल्पक क्रीडामैदान साकार होऊ शकले त्याचा फायदा येथील खेळाडूंना नक्कीच होईल.

 
या कार्यक्रम प्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव ,भाजप  महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री रवी अनासपुरे , पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक संदेश जाधव , नगरसेविका नीता दांगट , राजश्री नवले ,अश्विनी पोकळे , पंचायत समितीच्या सभापती फूलाबाई कदम , स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे , खडकवासला भाजप अध्यक्ष अरुण राजवडे, सचिन मोरे ,बाळासाहेब जाधव ,अनंत दांगट ,अविनाश चरवड , सागर भूमकर , बाळासाहेब पोरे ,संजय पवळे , सिद्धेश पाटील , कल्पेश ओसवाल , संतोष परदेशी ,चंद्रकांत पवळे , केदार जाधव ,युवराज जाधव , रमेश मिटकरी,बाळासाहेब तुपकर ,रामेश्वर चिखले, महापालिकेचे अभियंता सुरज पवार ,आर्किटेक कांबळे आदी मान्यवरांसह परिसरातील शेकडो खेळाडू ,नागरिक उपस्थित होते . 
No comments:

Post a Comment