हडपसर मधील हिंगणे मळा येथील कालव्याची दुरावस्था; रस्त्या खचला - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, January 6, 2020

हडपसर मधील हिंगणे मळा येथील कालव्याची दुरावस्था; रस्त्या खचलापुणे प्रतिनिधी : हडपसर मधील हिंगणे मळा आणि ससाने नगर येथून वाहणाऱ्या मुळा मोठा कालव्यावरील रस्ता खचला आहे आणि कालव्याचे ही दुरावस्था झालेली आहे याबाबत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे महापालिका व पाटबंधारे विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या असून मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांनी नेमका कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष स्मिता गायकवाड यांनी पाटबंधारे विभाग आणि महापालिका अधिकारी यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की रस्त्याची दुरावस्था आणि कालव्यात साचलेल्या कचऱ्यामुळे सभोवतालच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ,कालव्याची जाळी तुटलेली असून त्याचेही दुरुस्ती करावी आणि कालव्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर ही दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष स्मिता गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या सर्व मागणीचे निवेदन मंगळवार पेठेतील पाटबंधारे खात्याचे अधिकारी आर.ई.उबाळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक  कार्यकर्त्या अनिता हिंगणे उपस्थित होत्या


No comments:

Post a Comment