चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे- रुपाली चाकणकर - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, January 2, 2020

चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे- रुपाली चाकणकर


पुणेप्रतिनिधी 

यावर्षीप्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी मिळालेली नाही. दरवर्षी कोणत्या राज्याचा चित्ररथ संचलनात सहभागी होईल हे संबंधित मंत्रालय ठरवत असतं. शिवाय 2005, 2008, 2013 या वर्षीही राजपथावरच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. मात्र यावरुन राजकारण सुरु झाल्याचं दिसतंय.

प्रजासत्ताक दिनी दिल्ली इथे होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्यांचे चित्ररथ सामील होतात. मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे, असं म्हणत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

No comments:

Post a Comment