पुणे प्रतिनिधी : पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेविका दिपाली बाबा धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान या पदासाठी माजी महापौर वैशाली बनकर ,नगरसेविका नंदा लोणकर,नगरसेवक महेंद्र पठारे, सचिन दोडके ,योगेश ससाने हे इच्छुक होते त्यामधून दिपाली धुमाळ यांची निवड आज करण्यात आली आहे आगामी काळात हे पद एक वर्ष असणार असल्याचे राष्ट्रवादी तर्फे जाहीर करण्यात आले होते त्यानुसारच दिलीप बराटे यांना वर्षभरासाठी हे पद देण्यात आले होते तसेच विरोधी पक्षनेतेपदी दिपाली धुमाळ यांना संधी दिल्यामुळे त्यांनी पक्षांचे आभार मानले असून आगामी काळात शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले यावेळी पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ,नगरसेवक सचिन दोडके,अरुण पाटील उपस्थित होते
Friday, January 31, 2020

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेविका दिपाली धुमाळ यांची निवड
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक
श्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*
No comments:
Post a Comment