शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांची बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाळेस आर्थिक मदत - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, January 24, 2020

शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांची बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाळेस आर्थिक मदतपुणे - स्वर्गीय  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंती निमित्त नचिकेत बालग्राम,आकुर्डी येथे शिवसेनेचे चिंचवड विधानसभा शहर संघटक  संतोष रमाकांत सौंदणकर यांच्या शुभ हस्ते संस्थेचे अध्यक्ष भालचंद्रजी ब्रह्मेचा यांच्या कडे शाळेतील मुलांसाठी पुस्तके तसेच इतर क्रीडा साहित्य खरेदीसाठी रुपये 10000 चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेच्या   मुख्याध्यापिका सौ. नयना मावळे,   शिवसेना शाखाप्रमुख नितीन बोंडे,प्रदीप बेळगावकर, ओम परदेशी युवा सेनेचे राहुल पालांडे तसेच संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक वाचन दिन आहे. त्यानिमित्त त्या मुलांना पुस्तके विकत घ्यावे यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होईल असे मत संतोष 
सौंदणकर यांनी व्यक्त केले आहे.


No comments:

Post a Comment