'डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक स्नेहमेळावा संपन्न' - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 4, 2020

'डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक स्नेहमेळावा संपन्न'


पुणे प्रतिनिधी:औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक यांची सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेल्यास यश निश्‍चितपणे मिळते. तसेच पालकांनीही आपल्या पाल्याच्या मागे ठामपणे उभे राहून त्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायला पाहिजे. शिक्षक आणि पालक यांच्या मार्गदर्शनाने जर विद्यार्थ्याने वाटचाल केली, तर त्याला यश हमखास मिळतेच असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की,विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यास केल्यास यश निश्चितपणे मिळते. असे मत व्यक्त केले. यावेळी आर्ट्स विभागप्रमुख प्रा.रमेश पाटील, सायन्स  विभागप्रमुख प्रा.किर्ती, पवार, प्रा.कल्याणी  सोनवणे,  प्रा. सागर कांबळे, प्रा.अविनाश जाधव, प्रा.वेदश्री सरोदे तसेच बहुसंख्येने विद्यार्थी आणि पालक  उपस्थित होते.


No comments:

Post a Comment