पुणे, प्रतिनिधी: “ वर्तमान काळात भारतीय अर्थव्यवस्था ही सक्षम होत आहे. त्यामुळे येणार्या काळात देशात मोठे परिणाम दिसतील. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाबरोबरच आयुष्यभर शिकण्याची तयारी ठेवावी,”असा सल्ला इंडियन मर्चन्ट्स चेंबरचे अध्यक्ष आशिष वैद यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या २०१७ - १९ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा विश्वराजबाग,लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा घुमटातील तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्व शांती सभागृहात पदवीदान समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी आरपीजी लाईफ सायन्स लि.चे कार्यकारी संचालक युगल सिक्री व अर्लींगटन येथील द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे अध्यक्ष डॉ. विस्तास्प एम. कारभारी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी वडोदरा येथील सयाजीराव गायकवाड घराण्याचे जितेंद्रसिंग गायकवाड, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश जोशी, एमआयटीचे विश्वस्त डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा. डी.पी. आपटे, माजी कुलगुरू डॉ.एस.परशुरामन आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे हे उपस्थित होते.
आशिष वैद म्हणाले “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक बदल होत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. त्यात जनधन खाते उघडले. अशा आर्थिक नियोजनामुळे शेअर बाजारात ही मोठ्याप्रमाणात उथलापालट होत आहे. त्याच प्रमाणे देशातील छोट्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत परिवर्तन दिसून येत आहे.”
“ आज डिजिटलाइजेशनच्या युग आहे. या युगात टिकण्यासाठी आपली सिद्धता सिद्ध करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात गुगल वर सर्व माहिती उपलब्ध आहे. परंतू विद्यार्थ्यांनी भविष्यातील विचार करून योग्य दिशेने जाण्यासाठी या शिक्षणाचा उपयोग करावा. त्याचप्रमाणे आयुष्यभर शिकण्याची तयारी ठेवावी. जीवनाची दिशा ठरवून वाटचाल करावी. ”
डॉ. विस्तास्प एम. कारभारी म्हणाले, “ स्वतःहून निवडलेल्या या विद्यापीठात नवीन करण्याचा काही प्रयत्न केला आहे. तसेच समूहामध्ये काम करण्यची कला आपल्याला आली आहे. आपण हुशार विद्यार्थी असून जवाबदारी काय आहे, हे माहिती आहे. त्यामुळे स्वतःबरोबरच समुदायाचा विचार करावा. जीवनात अनेक अडथळे येतील त्याचा मुकाबला केल्यानंतरच यश प्राप्त होईल. कठीण परिश्रम, लक्ष्य आणि योग्य वेळेचे उपयोग या गोष्टी सदैव लक्षात ठेवावे.”
युगल सिक्री म्हणाले,“ जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरावर आपण प्रवास करीत असतो. अशावेळेस इच्छा आणि अनुभव असेल तर कोणतेही शिखर गाठता येईल. स्वप्न पाहूण काहीच साध्य करता येणार नाही. त्यासाठी योग्य प्रकारचे नियोजन असून त्या दिशेने चालावे. योग्य नियोजन करून त्यावर पाऊले उचलावेे. पदवी घेतल्यानंतर सदैव शिकत रहावे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“आज तुम्ही ज्या कोर्समध्ये पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर गुणवत्ता प्राप्त केली आहे त्याआधारे नामवंत अशा उद्योगधंद्यात किंवा सरकारी नोकरी आपली गुणवत्ता सिद्ध कराल. तुम्ही आपल्या माता पित्यांचा नाव उज्ज्वल करा. धर्म म्हणजे कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समजाच्या कल्याणासाठी केल्यास त्यातून समाजोन्नती होईल. तुमच्या योगदानातून भारत २१ व्या शतकात ज्ञानाचे दालन व विश्व गुरू म्हणून उदयास येईल. ”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची पगडी घालून आज पदवी प्रदान करण्यात आली आहे. भारतीय परंपरेचा हा संदेश संपूर्ण जगात पोहचेल. आज व्यावसायिक जगाच्या समुद्रात आपण पाऊल ठेवत आहात. तुम्हीच या विद्यापीठाचे राजदूत आहात. हे विद्यापीठ सदैव ‘वसुधैव कुटुम्बकम’ या तत्वाचे पालन करत आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण आहे.”
डॉ.एन.टी.राव यांनी प्रास्तावना मांडली.
प्रा. डॉ. अर्चना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment