पुण्याची ओळख बुद्धिमान लोकांचे शहर- पद्मभूषण शेखर गुप्ता , रेसिडेन्सी क्लब तर्फे पुणे प्राईड अवॉर्ड ने विविध क्षेत्रांतील नामांकितांचा सन्मान - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, January 8, 2020

पुण्याची ओळख बुद्धिमान लोकांचे शहर- पद्मभूषण शेखर गुप्ता , रेसिडेन्सी क्लब तर्फे पुणे प्राईड अवॉर्ड ने विविध क्षेत्रांतील नामांकितांचा सन्मान


पुणे,प्रतिनिधी: पुण्याच इतिहास स्वातंत्र्याआदि पासून आहे या शहरामध्ये मोठे- मोठे वैज्ञानिक अर्थशास्त्री विचारवंत लोक आहेत यामुळेच पुण्याची ओळख ही बुद्धीमान लोकांचे शहर अशी आहे . प्रसिद्ध पत्रकार आणि द प्रिंट एंड होस्टचे संस्थापक पद्मभूषण शेखर गुप्ता यांनी हे विचार व्यक्त केले. रेसिडेन्सी क्लब द्वारा आयोजित पुणे प्राईड अवॉर्ड कार्यक्रमात ते बोलत होते.


रेसिडेन्सी क्लब ने त्यांचे २८ वे वर्ष हे एका अनोख्या पद्धतीने साजरे केले . त्यांनी "पुणे'ज प्राईड अवॉर्ड"चे वितरण करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या  पुरस्काराने त्या लोकांना  पुरस्कृत करण्यात आले  जे त्यांच्या थोर कामगिरी साठी  परिचित आहे.
 
ब्रम्हाकॉर्प लिमिटेडचे ग्रुप चेअरमन  आर. के. अग्रवाल यांनी सुरू केलेल्या या  कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्स, कॉर्पोरेट, कला आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना  विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


प्रदीप भार्गव यांना कॉर्पोरेट कॅटेगरी मध्ये त्यांच्या अविस्मरणीय कामगिरी साठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांना ग्राहक ,औद्योगिक आणि ऊर्जा या तीनही क्षेत्रात दीर्घ काळाचा  अनुभव आहे.कमिन्समध्ये आपल्या  कार्याची सुरवात करण्या पूर्वी त्यांनी  अणु ऊर्जा आयोग, भेल, भारत फोर्ज ग्रुप आणि जनरल इलेक्ट्रिक यांच्याबरोबर काम केले आहे.

लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार     नितीन देसाई यांना प्रदान करण्यात आला ज्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे शिक्षण, वैद्यकीय आणि धर्मादाय क्षेत्रात गरीब आणि गरजूंना समर्पित केले आहे. ते  दृष्टिहीन व शैक्षणिक विश्वस्त व शाळा यासाठी धर्मादाय रुग्णालये चालवितात.

 पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर  रेसिडेंसी क्लब ने  देश सेवा आणि सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणार्या बहादुर सैनिकांच्या                        बलिदानाची आठवण करत ज्यांनी देशसेवेसाठी आपले प्राण  गमावले अश्या विर सैनिकांच्या पत्नींना यावेळी शिलाई मशीन भेट देण्यात आल्या.  

पुरस्कार:

· लाईफ टाइम: नितीन देसाई

· कॉर्पोरेट: प्रदीप भार्गव

· सोशल वर्क : रितु छाबरिया

· आर्ट अँड कल्चर : मुरली लाहोटी

· अकॅडमिक  : प्रोफेसर.  उत्तम भोईटे

· स्पोर्ट : नितीन कीर्तने

No comments:

Post a Comment