नेवासा - नेवासा शहरात CCTV कॅमेरे सर्वत्र बसवणार ; आ. शंकरराव गडाख यांच्याकडून त्यासाठी ५ लाख रुपये मदत - प्रशांत गडाख. | C24TAAS - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, December 28, 2019

नेवासा - नेवासा शहरात CCTV कॅमेरे सर्वत्र बसवणार ; आ. शंकरराव गडाख यांच्याकडून त्यासाठी ५ लाख रुपये मदत - प्रशांत गडाख. | C24TAAS


नेवासा - नेवासा शहरात CCTV कॅमेरे सर्वत्र बसवणार ; आ. शंकरराव गडाख यांच्याकडून त्यासाठी ५ लाख रुपये मदत - प्रशांत गडाख. | C24TAAS 
नेवासा होणार स्वच्छ सुंदर शहर,शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे - प्रशांत गडाख


नेवासा - स्वच्छ नेवासा सुंदर नेवासा होवू शकते फक्त नेवासकरांनी या शहराच्या सौंदर्यात माझ्या बरोबर रहावे असे प्रतिपादन मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात शहरातील व्यापारी व जेष्ठ नागरीकांची शहराच्या व्हिजन संदर्भातील बैठक घेण्यात आली त्यावेळी प्रशांत गडाख बोलत होते.यावेळी
उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,सतीश पिंपळे,विजय चंगेडिया गोरक्षनाथ काकडे, अशोक गुगळे,प्रा.यासीन शेख,प्रा.अशोक शिंदे,महेश मापारी,अमृत फिरोदिया,ज्ञानेश्वर जाधव यांनी शहरातील समस्यांविषयी मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलतांना गडाख म्हणाले नेवासा शहराच्या संदर्भात घेतल्या जाणाऱ्या विविध नियोजीत कामांचा आराखडाच सादर करताना हे काम माझ्या मार्गदर्शनाखाली होत असले तरी काम नेवासकरांचे असल्याने या निर्णय प्रक्रीयेत सर्वांचे योगदान असने आवश्यक आहे.आता कसलीही निवडणूक नाही.निवडणूकी नंतर मी हा मुद्दा हातात घेतलेला आहे अन तो तडीस नेला जाणार आहे.माझ्या समोर अनेक व्यापक विचार आहेत,ते योग्य व अत्याधुनिक पध्दतीने राबवले जाणार आहेत. त्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. संत ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासासाठी तसेच शहराला लागलेले वळण बदलण्यासाठी अनेक कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यातून काही वाईट विचारधारा असणारे विरोध करतील परंतू त्यासाठी मी सक्षम आहे.शहरात आज प्रशासनाचा धाक राहिलेला नाही.जे काम प्रशासनाने करायला पाहिजे ते नागरीकांना करावे लागणार आहे. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नाना-नानी पार्क, रस्त्यांचे रूंदीकरण, चौकांचे सुशोभीकरण यासाठी पैसा उपलब्ध करू त्याचा विनीयोग सर्व विचारवंत, जेष्ठ, सुशीक्षीत नागरीक, पदाधिकारी यांना याची सर्व माहिती दिली जाणार आहे. हा उपलब्ध झालेला पैसाच आपल्या सर्वांच्या सल्ल्याने खर्ची घालून विकास आराखड्याला गती दिली जाणार असल्याचे गडाख यांनी सांगीतले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

शहरात नेहमीच मोठ मोठ्या दुर्घटना घडत असतात, चोऱ्यांचे प्रमाण तर वाढतच चालले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले सिसिटिव्ही कॅमरे सर्वत्र बसवले जाणार आहेत, त्यामुळे रात्रीच्यावेळी काही प्रकार घडले तरी त्याचे चित्रीकरण दर्जेदार होवू शकते. त्यासाठी सर्वांचा सहभाग अवश्यक असल्याने आमदार शंकरराव गडाख हे ५ लाख रूपये देणार असल्याचे प्रशांत गडाख यांनी जाहिर केले.

शंकर नाबदे,नेवासा.मो.9960313029

No comments:

Post a Comment