नेवासा - आ.शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार ; तालुक्याला प्रथमच मंत्रिपद. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, December 29, 2019

नेवासा - आ.शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार ; तालुक्याला प्रथमच मंत्रिपद. | C24TAAS |

नेवासा - आ.शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार ; तालुक्याला प्रथमच मंत्रिपद. | C24TAAS |महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेच्या कोट्यातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार
नेवासा - माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी निवडणुकी अगोदर सोनई येथील कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान भाषणातून सांगितले होते की जे सरकार सत्तेत येईल त्या सरकारला पाठिंबा देऊन सत्य सामील व्हायचं असा आदेश ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आमदार शंकरराव गडाख यांना दिला होता त्यामुळे विधानसभेच्या निकालानंतर आमदार शंकराव गडाख यांनी सर्वात आधी शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले होते. सेनेला पाठिंबा देण्याचा आमदार शंकरराव गडाख यांचा निर्णय त्यांना थेट मंत्रीपदापर्यंत घेऊन गेला. नेवासा तालुक्याला प्रथम मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे.  महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेच्या कोट्यातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत. नेवासा मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपद मिळणार आहे. आमदार शंकरराव गडाख हे दुस-यांदा आमदार झालेले आहेत. २००९ मध्ये गडाख हे राष्ट्रवादीकडून आमदार होते, तर यावेळी त्यांचा शेतकरी क्रांतीकारी पक्षातर्फे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. 

No comments:

Post a Comment