नेवासा - प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा उत्साहात साजरा ; प्रार्थनेसाठी चर्चला यात्रेचे स्वरूप. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 25, 2019

नेवासा - प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा उत्साहात साजरा ; प्रार्थनेसाठी चर्चला यात्रेचे स्वरूप. | C24TAAS |

नेवासा - प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा उत्साहात साजरा ; प्रार्थनेसाठी चर्चला यात्रेचे स्वरूप.
नेवासा - प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा व नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.नाताळ निमित्ताने आयोजित प्रार्थनेप्रसंगी नेवासा येथील चर्च भाविकांच्या गर्दीने बहरली होती.यामुळे चर्चला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
         जीवनात परमेश्वराची भक्ती करून आध्यत्मिक वाढ करा,परमेश्वराला स्वीकारा,जीवनामध्ये संस्कृती संस्कार शिकवा,देवाचे लेकरू बनण्यासाठी प्रयत्न करा,जे देवावर श्रध्दा ठेवतात ते देवाची लेकरे बनतात,प्रत्येक रविवारी देवाचे वचन ऐका असे आवाहन ज्ञानमाऊली मंदिर चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांनी यावेळी बोलताना केले.


     यावेळी शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे,पोलीस निरीक्षक रणजित डेरे,नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,नगरसेवक इंजिनिअर सुनील वाघ,नगरसेवक राजेंद्र मापारी, राजेंद्र परदेशी,आमदार शंकरराव गडाख यांचे स्वीयसाहाय्यक सुनील जाधव,प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुहास पठाडे,मीडिया प्रतिनिधी कमलेश गायकवाड,मोहन गायकवाड उपस्थित होते यावेळी फादर प्रकाश राऊत यांचा सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,नगरसेवक इंजिनियर सुनीलराव वाघ,पत्रकार सुधीर चव्हाण यांनी नाताळ सणानिमित्ताने ख्रिस्ती बांधवांना भाषणाद्वारे शुभेच्छा दिल्या.       नेवासा शहरातील गंगानगर येथील बेथेल चर्चमध्ये रेव्हरंट डेव्हिड राक्षे,पास्टर विजय थोरात,पास्टर शारोन यांनी प्रार्थना व भक्ती गीते गायली तसेच नेवासा शहरातील चर्चमध्ये रेव्हरंट जगदीश चक्रनारायण,दत्ता अमोलिक, पास्टर सुभाष चक्रनारायण,पास्टर प्रकाश चक्रनारायण यांनी पवित्र प्रार्थनेद्वारे भक्तिगीते गात नाताळचा सणाचे महत्व सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले.      आमदार शंकरराव गडाख  यांच्या वतीने नेवासा शहरातील प्रत्येक चर्चमध्ये जाऊन भाविकांनी चिवडा पाकिटांचे वाटप करण्यात आले.

C24TAAS - शंकर नाबदे,नेवासा.मो.9960313029

No comments:

Post a Comment