नेवासा | शनी शिंगणापूर देवस्थानचा दर्शनाचा नियम पोलिस अधिकाऱ्यांनी मोडला! | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, December 22, 2019

नेवासा | शनी शिंगणापूर देवस्थानचा दर्शनाचा नियम पोलिस अधिकाऱ्यांनी मोडला! | C24TAAS |


नेवासा - शनी शिंगणापूर देवस्थानचा दर्शनाचा नियम पोलिस अधिकाऱ्यांनी मोडला!


नेवासा - संपूर्ण भारत देशासह इतर देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात मधील शनिशिंगणापूर येथील शनी दर्शनास शनिवारी व रविवारी देशातील भाविक येतात मात्र सध्या नाताळाच्या शाळेला सुट्ट्या सुरू झाल्याने अनेक भाविकांनी शिंगणापूर शिर्डी तसेच इतर देवस्थानचा जाऊन येण्याचा विचार केलेला असतो त्याचप्रमाणे शनिवार व रविवारी देशभरातील लाखो शनी भक्तांनी शिंगणपुरात येऊन दर्शन घेतले . गर्दी वाढल्यामुळे देवस्थानने भाविकांसाठी चौथ-यावरील दर्शन बंद केले होते. परंतु शिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्याने चौथ-यावर जाऊन दर्शन घेतल्याने भाविकानी नाराजी व्यक्त केली.
  गेल्या एक महिन्यापासून शनैश्वर देवस्थान शनी भक्तांच्या सुविधेसाठी चांगल्या प्रकारचे बदल करत आहे त्याचे भविकांतून स्वागत देखील होत आहे परंतु दर्शनासाठी सर्वांना समान न्याय मिळावा अशी मागणी होत आहे .

पोलिस अधिका-यांनीच मोडला शनिदर्शनाचा नियम पहा खालील व्हिडिओ. 👇

 गर्दीच्या काळात लांब पर्यंत भाविकांच्या रांगा लागतात त्यात लहान मुले , जेष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे गर्दी वाढल्यावर चौथ-यावरील दर्शन बंद करुन सर्वाना खालूनच दर्शन सुरु असते. शनिवार (ता.२१) रोजी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी चौथ-या खालून दर्शन घेतले परंतु रविवारी सकाळी ११ वाजता शिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्याने चौथ-यावर जाऊन दर्शन घेतले असता उपस्थित भाविकांनी चौथ-यालर जाण्याचा आग्रह केला व याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सर्वाना स्वयंभू शनी मूर्तीचे सहज,सुंदर दर्शन व्हावे याकरिता विश्वस्त मंडळाने सर्वांसाठी चौथ-या खालूनच दर्शन घ्यावे अशी देवस्थानने सूचना केल्यावर दर्शन व्यवस्था सुरळीत सुरु झाली. मात्र याला संबधित पोलीस अधिका-याने स्वतःच नियम मोडून चौथ-यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर उपस्थित भाविकांनी या कृत्याचा निषेध केला .

शिंगणापुरात येणाऱ्या भाविकांना अनेक गोष्टींचा त्रास.
शिंगणापुरात मुख्य रस्त्यावरील वाढते अतिक्रमण,कमिशन एजंटांची दादागिरी,फेरीवाले,छायाचित्र काढणारे व भिका-यांचा भाविकांना होणारा वाढता त्रास लक्षात घेवून देवस्थान विश्वस्त मंडळाने १जानेवारी२०२० पासून या बाबीवर पाऊल उचलले असून शिंगणापूर पोलीस ठाण्याने व्यावसायिकांच्या अर्थपुर्ण व्यवहारात न गुंतता भाविकांना अग्रक्रम देणे गरजेचे आहे.

C24 तास - शंकर नाबदे,नेवासा.

No comments:

Post a Comment