कलात्मक परंपरेतून दीर्घकालीन समस्येवर उपाय सतत कचरा टाकल्या जाणाऱ्या जागांवर सुंदर रांगोळीचे रेखन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 18, 2019

कलात्मक परंपरेतून दीर्घकालीन समस्येवर उपाय सतत कचरा टाकल्या जाणाऱ्या जागांवर सुंदर रांगोळीचे रेखनपुणेप्रतिनिधी:कचरा हा कायम सतावणारा प्रश्न राहिला असून काही जागांवर तो एवढ्या मोठ्या प्रमाणात व सतत टाकला जातो की त्यांचे रुपांतर उकीरड्यामध्ये होते.

या जागांच्या जवळपास राहणारे नागरिक तक्रार करतात, निषेध नोंदवितात पण त्याचा विशेष उपयोग होत नाही कारण रस्त्यांच्या कडेला कचरा टाकणारे नक्की कोण असतात हे शोधून त्यांच्यावर त्याची जबाबदारी टाकणे शक्य नसते. वारंवार स्वच्छता मोहिमा राबवून देखील उपयोग होत नाही कारण त्या जागांचा उकिरडा म्हणून वापर ठरून गेलेला असतो आणि त्यामुळे तिथे पुन्हा पुन्हा कचरा जमत राहतो.

या जागांचे उच्चाटन व्हावे तसेच अन्य ठिकाणी अशा जागा पुन्हा निर्माण होऊ नयेत याकरिता स्वच्छ संस्था व पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी अशा जागा रांगोळ्यांनी सुशोभित करण्याचे काम हाती घेतले आहे. या जागा प्रथम संपूर्णपणे स्वच्छ करून नंतर त्यांवर कलात्मक रांगोळ्या काढण्याचे काम काही काळापासून सुरु झाले आहे  त्याला आता गती मिळत आहे. दि. ३ डिसेंबर च्या आठवड्यात या कामाला अधिक बढावा देण्याकरिता एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे सह-आयुक्त, श्री. मोळक म्हणतातपुणे शहर हे कचरामुक्त GFC करण्याकरिता क्रॉनिक स्पॉट साठी दिनांक .१२.२०१९ ते दिनांक १०.१२.१९ या कालावधीत एक विशेष मोहिम हाती घेतली आहेदररोज क्रॉनिक स्पॉट स्वच्छ केला जात असून तेथे रांगोळी काढली जात आहे. आमच्या सोबत स्वच्छ संस्था देखील काम करत आहे.” या जागा कायम स्वरूपी स्वच्छ राहण्याकरिता जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ सदर उपक्रम सुरु ठेवण्यात येईल.

रांगोळी म्हणजे पीठाचा वापर करून केलेले सुंदर पारंपारिक नक्षीकाम. “रांगोळीवर पाय देणे लोक टाळतात  म्हणून अशा ठिकाणी कचरा फेकणे देखील टाळले जाईल अशी अपेक्षा आहे. लोक थबकून तेथे पाहतात  कचऱ्याऐवजी त्यांना तेथे सुंदर रांगोळी पाहायला मिळते,” अशा एका उकिरड्याचे उच्चाटन झालेल्या औंध विभागात काम करणाऱ्या मीना मोरे म्हणतात.

“असे उकिरडे केवळ शहरास कुरूप बनवत नाहीत तर तेथील अस्वच्छतेमुळे रोगराई वाढून वातावारण देखील अनारोग्यकारक बनते. शिवाय उन्हाच्या उष्णतेमुळे दुर्गंधी पसरते,” मोरे म्हणतात. “ शिवाय अशा जागी सगळेच कचरा टाकू लागतात कारण इथे कचरा टाकताना त्याचे वर्गीकरण करावे लागत नाही. त्यामुळे पुनःचक्रीकरण होण्यासारखा माल देखील लँडफिलवर जाऊन पोहोचतो आणि पुनर्वापराच्या चक्रातून बाहेर फेकला जातो.

अनेक ठिकाणी स्थानिक नगरसेवक देखील अशा जागांना प्रत्यक्ष भेट देऊन सदर उपक्रमास प्रोत्साहन देत आहेत. लोकांच्या मनातून हे ठिकाण म्हणजे उकिरडा ही भावना पुसली जाण्याची गरज आहे याचा ते पुनरुच्चार करतात. ही भावना नाहीशी करण्याकरिता अशा ठिकाणांवर रांगोळी काढण्याचा खूप परिणामकारक उपयोग होतो.

स्वच्छचे समन्वयक तसेच पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी रहिवाशांना त्यांचा कचरा दारोदार कचरा संकलन व्यवस्थेमध्ये देताना त्याचे वर्गीकरण करून देण्याकरिता प्रोत्साहन देत असतात, ज्यामुळे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनावरील भार कमी होऊन शहर स्वच्छ रहाण्या देखील मदत होते. रस्त्यावर कचरा टाकणे रोखण्याकरिता त्यांनी अशा उकीरड्याच्या ठिकाणांवर फलक लावले आहेत  जाणीव जागृती कार्यक्रमांमधून देखील अशा ठिकाणांवर कचरा टाकण्यापासून ते नागरिकांना परावृत्त करत असतात. नागरिक देखील याचे स्वागत करीत आहेत व हा संदेश पसरविण्यात मदत करीत आहेत. श्री. भास्कर, एक जागरूक व कृतीशील नागरिक, म्हणतात, “वागणुकीतील बदल हा कचरा व्यवस्थापनातील एक महत्वाचा घटक आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये याकरिता आवश्यक असलेला वागणुकीतील बदल प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या शहराने रांगोळीची मदत घेतली आहे. रांगोळी असलेली ही सर्व ठिकाणे यापूर्वी कोणतीही उपाययोजना होऊ शकत नसलेले उकिरडे होते. परंतु सर्व गुंतवणूकदारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दृष्टीकोनात हळूहळू बदल होत असल्याचे दिसत आहे. आपण प्रयत्न जरी ठेवले पाहिजेत.

स्वच्छ व सुधारित शहर निर्माण करण्याकरिता स्वच्छ व पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी शहरभरातील उकीरड्याच्या जागांचे हिरीरीने उच्चाटन करीत आहेत.

No comments:

Post a Comment