नेवासा - महाबीज तर्फे तूर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, December 19, 2019

नेवासा - महाबीज तर्फे तूर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न.

महाबीज तर्फे नेवासा येथे तूर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न.
नेवासा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला विभागीय कार्यालयांतर्गत खरीप हंगामातील तुर राजेश्वरी पिक प्रात्यक्षिक नेवासा येथील प्रगतशील शेतकरी श्री दामोदर हारदे यांच्या शेतावर कार्यशाळा संपन्न झाली.
       सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अशोकराव ढगे कृषी शास्त्रज्ञ हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. चांगदेव वायळ कीटनाशक शास्त्रज्ञ व महाबीज चे जिल्हा व्यवस्थापक श्री रवींद्र जोशी हे उपस्थित होते.
     यावेळी डॉ. वायळ यांनी तुर पिकावरील कीड व रोग राई यांची माहिती व त्यावरील उपाय योजनेचे मार्गदर्शन केले तसेच जिल्हा व्यवस्थापक श्री जोशी साहेब यांनी बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यास संदर्भात मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात श्री डॉ. ढगे सर यांनी शेतीची पंच सूत्री कार्यक्रम जमीन पाणी खत व संबंधित माहिती दिली.
   या कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे अधिकारी गोरे एस बी, दिपक भागवत, सहाय्यक क्षेत्र अधिकारी सौ रोहिणी काकडे, प्रशांत वेताळ, प्रगतिशील शेतकरी प्रशांत देशमुख, सुधाकर लोंढे, सचिन देशपांडे, पोपट गवळी, रमेश गगे, सुखदेव मंडलिक, मच्छिंद्र कडू,नलगे सर, वसंत मोहिते यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

शंकर नाबदे,नेवासा.मो.9960313029

No comments:

Post a Comment