श्रीगोंदा भाजपा तालुकाध्यक्ष पदी संदीप नागवडे यांची एकमताने निवड. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, December 22, 2019

श्रीगोंदा भाजपा तालुकाध्यक्ष पदी संदीप नागवडे यांची एकमताने निवड.
श्रीगोंदा - तालुका भाजपा मंडळअध्यक्ष निवड आज श्रीगोंद्यात माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा संघटनात्मक निवडणूक निरीक्षक अशोक आहुजा व जिल्हा प्रतिनिधी प्रसाद ढोकरीकर, रमेश पिंपळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी संदिप नागवडे यांची तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. माऊली निवास संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत नागवडे यांच्या निवडीची घोषणा निवडणूक निरीक्षक अशोक आहुजा यांनी केली. 

यावेळी मावळते तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, भगवानराव पाचपुते विठ्ठलराव काकडे,  जि प  सदस्य सदाशिवराव  पाचपुते, युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, संतोष लगड, सभापती शहाजी हिरवे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके इ. सह पक्षाचे सर्व  पदाधिकारी,  न.पा.नगरसेवक, जि.प/पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटी सदस्य, तालुका देखरेख संघाचे सदस्य, महिला आघाडी पदाधिकारी, सहकारी संस्थाचे पदाधिकारी, युवक आघाडीचे पदाधिकारी, विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, व कार्यकर्ते   मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment