हैद्राबाद येथे झालेल्या डाँक्टर प्रियंका रेड्डि सामुहिक बलात्कार व खूनप्रकरणी निषेध तसेच आरोपीना लवकरात लवकर फाशी होण्याकरता महिला राजमाता आंदोलन आंबेगाव तालुका यां संघटनेच्या वतीने तहसिल व पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले
हैद्राबाद येथे डाँ प्रियंका रेङ्ङि या महिलेवर सामुहीक बलात्कार करण्यात आला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने निघृण खुन करण्यात आला.ही घटना खुपच घृणास्पद व निंदनीय आहे,आज 21 व्या शतकातही महिलांचे जीवन सुरक्षित नाही,त्यामुळे या प्रकणाबाबत आम्ही महिला राजसत्ता आंदोलनाच्या वतिने निषेध व्यक्त करतो .या निवेदनाद्वारे डाँ प्रियंका रेड्डि यांच्यावर अन्याय व अत्याचार करणार्या नराधमांना फाशी शिक्षा व्हावी.अशी मागणी केली.तरी शासनाचे प्रतिनीधी म्हणुन महिला राजसत्ता आंदोलनाची हि भूमिका वरिष्ठ पातळिवर पोहचवण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे
आंबेगाव तालुक्यातील तहसिलदार आणि पोलिस प्रशासनाला महिला राजसत्ता आंदोलन या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.या वेळी सुनंदाताई मांदळे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक,निलमताई टेमगिरे पंचायत आघाडी प्रमुख आंबेगाव, सुमनताई थोरात सरपंच शेवाळवाडी व पंचायत आघाडी उपप्रमुख,प्राजक्ता रोडे सरपंच लाखणगाव,मानिषा तोत्रे सरपंच कुरवंङी,लताताई मेंगडे माजी सरपंच मेंगडेवाङी आदि पदाधिकारी महिला उपस्थित होत्या
No comments:
Post a Comment