कोपरगाव - कोपरगावात तरुणीची आत्महत्या अर्ज चुकल्याने शिष्यवृत्ती बुडल्याच्या कारणातून केली आत्महत्या - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, December 3, 2019

कोपरगाव - कोपरगावात तरुणीची आत्महत्या अर्ज चुकल्याने शिष्यवृत्ती बुडल्याच्या कारणातून केली आत्महत्या

कोपरगावात तरुणीची आत्महत्या

अर्ज चुकल्याने शिष्यवृत्ती बुडल्याच्या कारणातून केली आत्महत्या

कोपरगाव शहरातील इंदिरापथ मार्गावर वाणी सोसायटीत रहिवाशी असलेल्या कु. पूजा संजय अरगडे या सतरा वर्षीय तरुणीने काल सायंकाळी ऑनलाइन शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे आपली 70 हजारांची शिष्यवृत्ती बुडाल्याच्या कारणावरून आपल्या घरी कोणी नाही हि संधी साधत काल सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घराच्या छताला असलेल्या पंख्याला ओढणी बांधून तिच्या साहाय्याने आत्महत्या केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
पूजा ही इंजिनियर कॉलेज मध्ये आय टी थर्ड इयर चे शिक्षण घेत होती.
कोपरगाव न्यायालयात दुर्घटनाग्रस्त मुलीचे वडील नोकरीस असून ते काल सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले असताना घरी सदर मुलगी व तिची आई या दोघीच होत्या .  तिच्या आईने सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास तिच्या वडिलांना भ्रमनध्वनिवरून,” आपण बाजारात चाललो असून तुमचे कार्यालय बंद झाल्यावर तुम्ही मला बाजारात घेण्यासाठी या” असे सांगितले होते त्या प्रमाणे ते दोघे आपली कामे आटोपून घरी आले असता घराचा दरवाजा त्याना बंद आढळला. त्यांनी आपल्या मुलीला हाक मारून प्रतिसादाची वाट पहिली मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही.
त्यामुळे त्यांनी तिच्या भ्रमनध्वनिवरून संपर्क साधून पहिला असता त्यालाही आतून प्रतिसाद आला नाही.तिचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले.दरम्यान या वसाहतीतील आसपासचे नागरिक जमा झाले त्यांनी घराचे निरीक्षण करत आत डोकावून पहिले असता सदर मुलीने घराच्या छताला ओढणी बांधून  गळफास घेतल्याचे लक्षात आले.आतील घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला पोलिसांच्या समक्ष लोखंडी दरवाजाचे गज कापून तिला खाली उतरून उपचार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची आपल्या दप्तरी नोंद केलीय असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment