पुणे छावा स्वराज्य सेनेकडून वारजे भागातील नागरिकांच्या विविध तक्रारी संदर्भात वारजे पोलीस स्टेशनला निवेदन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, December 26, 2019

पुणे छावा स्वराज्य सेनेकडून वारजे भागातील नागरिकांच्या विविध तक्रारी संदर्भात वारजे पोलीस स्टेशनला निवेदनपुणे प्रतिनिधी: पुण्यातील वारजे भागामध्ये काही ठिकाणी वाढत चाललेली गुंडागिरी तसेच मद्यप्राशन करून स्थानिक रहिवाशांना नेहमी त्रास देणे तसेच महिलांची छेडछाड करणे मारहाण करणे अशा घटना या भागात वारंवार घडत असतात या घटनांवर अंकुश लावावा या मागणीसाठी पुणे छावा स्वराज्य सेना संस्थापक अध्यक्ष राम घाईतिडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य छावा सेनेच्या प्रदेश अध्यक्ष शितल हुलावळे यांनी वारजे पुणे स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे आणि होणाऱ्या घटनांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्यावर पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी ताबडतोब कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे
 या वेळी निवेदन देताना छावा स्वराज्य सेनेच्या अश्विनी तारू,मंगल कांबळे,मीना ठुले,सुनीता शहाणे तसेच वारजे भागातील  महिला सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
.

No comments:

Post a Comment